AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीबीआयची मोठी कामगिरी, नाशिकमधील बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त, 5 जणांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) येथे भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सीबीआयची मोठी कामगिरी, नाशिकमधील बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त, 5 जणांना अटक
call center
| Updated on: Aug 10, 2025 | 6:33 PM
Share

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) येथे भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील रहिवासी असलेल्या 6 आरोपींविरोधात तसेच अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सीबीआयच्या या कारवाईत 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, सोने, लक्झरी कार आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या आरोपींनी अज्ञात व्यक्तींसोबत गुन्हेगारी कट रचला आहे आणि अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचे भासवून बेकायदेशीर कॉल सेंटरमधून तोतयागिरी करून आणि फिशिंग कॉल/फसवे कॉल करून आर्थिक फसवणूक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या आरोपींनी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक केली आहे. गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक करून पैसे मिळवले आहे. हे कॉल सेंटर इगतपुरी, नाशिक मध्ये सुरु होते. आरोपींनी सदर बेकायदेशीर कॉल सेंटर चालविण्यासाठी डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा सुमारे 60 ऑपरेटरची नियुक्ती केली होती अशी माहितीही समोर आली आहे.

सीबीआयने आपल्या कारवाईत 44 लॅपटॉप आणि 71 मोबाईल फोनसह 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त केल्या आहेत. तसेच अंदाजे 5000 USDT क्रिप्टोकरन्सी (5 लाख रुपये) आणि 2000 कॅनेडियन डॉलर किमतीचे गिफ्ट व्हाउचर (1.26 लाख रुपये) जप्त केले आहेत.

सीबीआयच्या कारवाईत कॉल सेंटरमध्ये काम करणारे 62 कर्मचारी लाईव्ह ऑपरेट करताना आढळले. त्यांच्याकडून परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या स्कॅमच्या माध्यमातून किती लोकांची फसवणूक झाली? यात आणखी कुणाचा हात आहे का? याची चौकशी केली जाणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.