”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या

प्रशांत नावाच्या या विद्यार्थ्याने ''शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे'' ही कविता सादर करत आपलं आवाहन केलं.

''शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे'', मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या


अहमदनगर : शेतकरी आत्महत्या हा गंभीर प्रश्न तयार तयार झाल्याने अनेक स्तरातून शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात येत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका तिसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलानं केलं. प्रशांत नावाच्या या विद्यार्थ्याने ”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे” ही कविता सादर करत आपलं आवाहन केलं. मात्र, त्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये त्यांच्या कानावर त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आली (Farmer Suicide after poem of son in ahmednagar). हृदय पिळून टाकणाऱ्या या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भारजवाडी येथे शाळेत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रशांत नावाच्या विद्यार्थ्याने ”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे” ही कविता सादर केली. काही वेळातच ही कविता सोशल मीडियावर व्हायरलही झाली. मात्र, त्यानंतर दोनच तासांनी त्याच्या शेतकरी वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. हृदय पिळून टाकणारी ही घटना मल्हारी बटुळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.


आपण ज्या शेतकरी समुहाला आत्महत्या न करण्याचं आवाहन करत होतो, त्याच शेतकरी समुहातील आपल्या वडिलांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने तिसरीमध्ये शिकणारा प्रशांत पूर्ण हादरुन गेलाय. आपल्यावर प्रेम करणारे ‘पप्पा’ आता नाहीत, हे स्वीकारताना त्याला त्यांनी हा निर्णय का घेतला याचं उत्तर मिळेना. दैनंदिन व्यवहारांपासून दूर आपलं बालपण जगणाऱ्या या निरागस प्रशांतला बसलेला हा धक्का अनेकांच्या काळजीचा विषय झाला आहे. सोशल मीडियावरही त्याच्याबद्दल हीच वेदना व्यक्त होताना दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ:


Farmer Suicide after poem of son in ahmednagar