कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
वैजापूर येथील भवानी स्वीटमध्ये कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याच्या आरोपानंतर FDA ने तातडीने कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी दुकानाची तपासणी केली असता, विना परवाना फूड बिजनेस केल्याचंही आढळलं.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील भवानी स्वीट या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली. या दुकानातील कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा आरोप एका ग्राहकाने केल्यानंतर प्रशासनाने दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानात विना परवाना खाद्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आलं. तसेच, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या शेड्युल 4 मधील स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही तपासणीत समोर आले. या गंभीर बाबींची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी कारवाई करत संबंधित दुकान सील केलं.
अन्न व औषध प्रशासनातर्फे (FDA) सध्या राज्यात धाडींचं सत्र सुरू असून त्यामुळे रेस्टॉरंट मालक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. FDAतर्फे अनेक ठिकाणी धडक टाकून स्वच्छता, सुरक्षा परवाना, लायसन्स यांचा आढवा घेतला जात असतो. स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या, भेसळ करणाऱ्या अनेक दुकानदारांविरोधात आत्तापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजनगरमधील या कारवाईचीही आता जोरदार चर्चा होत आहे.
बातमी अपडेट होत आहे.