तुमच्या घरातील फ्रीज उघडून पाहा… तुकाराम मुंढे यांचे मोठे आवाहन, थेट म्हटले..

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाची चर्चा फक्त राज्यातच नाही तर देशभरात होत आहे. तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत. त्यातच नुकताचन तुकाराम मुंढे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.

तुमच्या घरातील फ्रीज उघडून पाहा... तुकाराम मुंढे यांचे मोठे आवाहन, थेट म्हटले..
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 28, 2026 | 7:54 PM

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून मोठ्या कारवाया ते राज्यभरात करत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे सर्वत्र काैतुक केले जात आहे. भेसळखोऱ्यांविरोधात तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई केली जात आहे. भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. दूध, पनीर या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत होती. सर्वसामान्य नागरिक भेसळयुक्त गोष्टींचे सेवण करत होते. भेसळ खोरांविरोधात त्यांनी बेधडक कारवाई केली आहे. जवळपास राज्यात दुधाची तपासणी वाढली. यासोबतच अनेक खाद्यपदार्थांमधून रंग गेली आहेत. जिलेबीचा रंगही अगोदरसारखा पिवळा दिसत नाही, हा तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा थेट परिणाम दिसून येत आहे. मध्यंतरी तुकाराम मुंढे यांची बदली होणार असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली.

नुकताच आता तुकाराम मुंढे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मोठे विधान केले. अन्न सुरक्षेबाबत आपल्या देशात किती जास्त संवेदनशीलतेचा अभाव आहे, हे तुकाराम मुंढे यांनी थेट सांगितले. एक साधे उदाहरण देत तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, जर तुम्ही तुमच्या घरचे फ्रीज उघडले आणि बघितले तर तुम्हाला त्यात अनेक मुदत संपलेले मसाले किंवा इतर खाद्यपदार्थ दिसतील.

Loading...

अन्न सुरक्षेबाबत फक्त बाहेर हॉटेलमध्येच न बघता आपण काही गोष्टी घरातही पाळल्या पाहिजेत. यादरम्यानच हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किंमतीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, आम्ही केंद्र सरकारला याबाबत एक सविस्तर अहवाल हा दिला आहे. 150 टक्क्याहून 2800 टक्क्यांपर्यंत नफा आकारला जात आहे, हे स्पष्ट होते.

तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, 2006 मध्ये जेव्हा अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला, त्यावेळी देशात ऑनलाईन फूड डिलिव्हरी, डार्क स्टोअर्स या संकल्पनाच मुळात नव्हत्या. आज काळ पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे आव्हाने देखील नवीन आहेत. स्वतंत्र नियमावली असणे खूप जास्त गरजेचे आहे. तुकाराम मुंढे यांनी मोठ्या रेस्टारंटवरही धाडी टाकल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us