इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याला तोबा खर्च, महाराजांचे मानधन नेमके किती? जाणून घ्या..

किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत. इंदोरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात इतका जास्त खर्च केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याला तोबा खर्च, महाराजांचे मानधन नेमके किती? जाणून घ्या..
Nivruti Maharaj Indorikar
| Updated on: Nov 07, 2025 | 2:42 PM

प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या तूफान चर्चेत आहे. यावेळी ते त्यांच्या किर्तनामुळे नाही तर लेकीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत. लग्न साधे करा, असा संदेश देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मात्र, आपल्या लेकीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात केला. हेच नाही तर सोन्याचे ढिगभर दागिने, रथात लेकीचे आणि जावयाचे आगमन आणि बरेच काही या साखरपुड्यात बघायला मिळाले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. जगाला सांगे ब्रह्मज्ञान स्वतः: कोरडे पाषाण, अशी म्हणायची वेळ आली. इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यातील काही व्हिडीओ आणि फोटो पुढे आलीत. अत्यंत आलिशान पद्धतीने साखरपुडा झाला. पैशांची उधळण लेकीच्या साखरपुड्यात महाराजांनी केली.

इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याती थाट पाहून सर्वांनाच आता प्रश्न पडला की, इंदोरीकर महाराज एका किर्तनाच्या कार्यक्रमासाठी नेमके पैसे घेतात तरी किती? इंदोरीकर महाराज खूप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या किर्तनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. इंदोरीकर महाराजांचे किर्तन म्हटले की, लोक कित्येक किलो मीटरचा प्रवास करू ऐकण्यासाठी येतात. शेतकऱ्यांनी मुलांची लग्न साध्या पद्धतीने करायला पाहिजे, असे अनेकदा इंदोरीकर महाराज सांगतात.

जर तुम्हाला इंदोरीकर महाराजांचे किर्तन तुमच्या गावात घ्यायचे असेल तर दोन दोन वर्ष त्याकरिता तुम्हाला वाट बघावी लागते. इंदोरीकर महाराजांनी ज्याप्रकारे आपल्या लेकीचा साखरपुडा केला, त्यानंतर त्यांच्या किर्तनाच्या मानधनाची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. इंदोरीकर महाराज इतर किर्तनकारांपेक्षा मानधन अधिक घेतात, असे कायमच सांगितले जाते. मात्र, त्यांचे मानधन असे काही फिक्स नाहीये.

साधारणपणे एका किर्तनाच्या कार्यक्रमासाठी इंदोरीकर महाराज 60 हजार ते 1 लाखाच्या पुढे मानधन घेतात, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटले होते की, गाैतमी पाटील हिच्या नृत्यासाठी लोक तीन लाख रूपये देतात आणि आम्ही थोडे मानधन वाढवले तरीही त्यांची कटकट सुरू होते. कुठेही किर्तन ठेवायचे असेल तर लोकांची पहिली पसंती ही फक्त आणि फक्त इंदोरीकर महाराजांनाच असते.