नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर भर दिवसा गोळीबार, दोन गोळ्या झाडल्या
नाशिक शहरात भरदिवसा रविवारी सकाळी गोळीबार झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर हा गोळीबार झाला आहे. एकामागे एक दोन राऊंड फायर झाले आहेत. या घटनेत भाजप पदाधिकारी गंभीर झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला.

चंदन पुजाधिकारी, नाशिक : राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. नाशिक शहरात झालेल्या या गोळीबारामुळे शहरातील गँगवार पुन्हा उफाळून आले आहे. एकामागे एक दोन राऊंड फायर झाले आहेत. यामध्ये भाजप पदाधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्ववैमानस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कामगार आघाडी माथाडी सेलचे जिल्हाध्यक्ष असलेले राकेश कोष्टी यांच्यांवर भरदिवसा गोळ्या झाडल्या गेल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहेत.
कशी घडली घटना
नाशिकमध्ये अंबडच्या भर वस्तीत रविवारी सकाळी गोळीबार झाला. भाजप पदाधिकारी व भाजप कामगार आघाडी माथाडी सेलचे जिल्हध्यक्ष राकेश कोष्टी यांच्यांवर अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. राकेश कोष्टी हे रविवारी सकाळी आपल्या घराजवळ उभे असताना हल्लेखार आले आणि त्यांच्यांवर दोन राऊंड चालवून फरार झाले. या घटनेत राकेश कोष्टी यांच्या पोटात गोळ्या गेल्या. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे.
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली
नाशिक शहराची ओळख धार्मिक शहर म्हणून झाली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून नाशिमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकंवर काढले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता नाशिकमधील एमआयडीसी असलेल्या अंबड परिसरातील बाजीप्रभू चौकात रविवारी सकाळी गोळीबार झाला. भाजपचे माथाडी कामगार शहराध्यक्ष राकेश कोष्टी यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहेत
