AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर बंडखोर खासदारांचा एकत्रित फोटो समोर, पंचतारांकित हॉटेलात… तो बडा नेता कोण? सस्पेन्स वाढला

शिवसेना ठाकरे गटातील एकून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. मात्र त्यापैकी ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर 5 खासदार नक्की कुठे आहेत याचा कोणालाही पत्ता नाही. यादरम्यानच बंडखोर खासदारांचा पहिली फोटो पुढे आल्याचे बघायला मिळतंय.

अखेर बंडखोर खासदारांचा एकत्रित फोटो समोर, पंचतारांकित हॉटेलात... तो बडा नेता कोण? सस्पेन्स वाढला
Operation Tiger MP First photo
| Updated on: Jun 20, 2026 | 10:02 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाविरोधात ऑपरेशन टायगर राबून पहिल्याच दणक्यात शिवसेना शिंदे गटाने तब्बल 6 खासदार फोडले. एकूण 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागले. यापैकी 5 खासदार नक्की कुठे आहेत, याबाबत अद्याप माहिती नाही. या 5 खासदारांना सुरक्षितस्थळी हलवल्याचे कळते. राजस्थानमध्ये या खासदारांना ठेवल्याची माहिती मिळत होती. 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील केसचा निकाल असल्याने ओमराजे कुटुंबासोबत आहेत. ते कुठेही केले नाहीत, ते पुण्यातच होते. आज मुंबईत निकाल असल्याने ते पुण्याहून मुंबईत दाखल झाले. मात्र, 5 बंडखोरी केलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नक्की कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती नाही. यादरम्यानच आता बंडखोरी करणाऱ्या खासदारांचा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधील पहिला फोटो पुढे आला.

ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो पुढे आला. या फोटोत बंडखोर खासदार दिसत आहेत. जेवणाच्या टेबलवरील हा फोटो दिसत आहे. सर्वजण जेवणाच्या टेबलवर बसल्याचे दिसतंय. कोणत्यातरी हॉटेलमधील हा फोटो असल्याचे दिसतंय. ऑपरेशन टायगरनंतर बंडखोर खासदार कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात होता, याचदरम्यान हा फोटो पुढे आला. ऑपरेशन टायगरचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ पुढे येत नव्हता.

आता हा पहिला फोटो आला. या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे खासदार, संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे दिसत आहेत. हे 3 खासदार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे फोटोवरून दिसून येत आहे. मात्र, हे खासदार नक्की कुठे थांबले आहेत, हे स्पष्ट होऊ शकत नाही. ऑपरेशन टायगरच्यानंतर पहिल्यांदाच हा फोटो पुढे आला असून tv9 च्या हाती लागला आहे.

शिवसेनेचे समन्वयक अभिषेक वर्मा देखील या फोटोत दिसत आहेत. खासदार संजय दीना पाटील या फोटोत गंभीरपणे बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे कोणतातरी बडा नेता बसल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर या ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी आहे. हे ऑपरेशन यशस्वी झाले. हा पहिला फोटो बंडखोर खासदारांचा पुढे आला. ठाकरेंच्या या बंडखोर खासदारांना सुरक्षित पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल