AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्यासारख्या नेत्यांमुळेच… खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचा ठाकरे गटातील नेत्यावर संताप, थेट..

Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil : ठाकरेंच्या शिवसेनेतून 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील नेते आक्रमक आहेत. 6 खासदारांवर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून टीका केली जात आहेत. मात्र, सुषमा अंधारे यांच्या टीकेला आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाने प्रतिउत्तर दिले.

तुमच्यासारख्या नेत्यांमुळेच... खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचा ठाकरे गटातील नेत्यावर संताप, थेट..
Nagesh Patil Ashtikar Krishna Ashtikar
| Updated on: Jun 19, 2026 | 8:29 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाला सोडून 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी वेगळ्या गटाचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गटाला तब्बल 6 खासदार सोडून जात असल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केल्याने मोठा झटका बसला. 19 जूनला हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे, तशी सूत्रांची माहिती आहे. व्हिप जारी करूनही हे खासदार बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने यांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली. 7 दिवसांच्या आत या खासदारांना पक्षाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 6 खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, हे खासदार बंडखोरीवर ठाम आहेत. राजस्थानमध्ये हे खासदार असल्याचे सांगितले जाते. अज्ञातस्थळी हा खासदारांना हलवण्यात आले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या खासदारांच्या संपर्कात आहेत.

या 6 खासदारांच्या यादीत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याही नावाचा समावेश आहे. नागेश पाटील यांनीही शिवसेना ठाकरे गटाविरोधात बंडखोरी केली. नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधान परिषदेची निवडणूक लढत आहे. त्याला पक्षाकडून तिकिट देण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सतत नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर टीका करत आहेत.

अखेर कृष्णा आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले. वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर पहिल्यांदाच भाष्य केले. कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले की, मी उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहे. मी सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यास बांधील नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे.

ज्यादिवशी नागेश पाटील आष्टीकर यांचा फोन बंद झाला, त्यादिवसापासून माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले नाही. सुषमा अंधारे यांनी पार आमच्या खानदानाचा उद्धार केला. मला खूप वाईट वाटले. मुळात म्हणजे वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात हे समीकरण काही नवीन नाही. माझे वडील अजून तिकडे गेले का? यांना कसली नेमकी घाई आहे, हेच कळत नाही. अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आल्याचेही कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले.

Follow Us
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...