मनसेची चेष्टा झाली, कुटुंब एकत्र आले तरीही… संतोष धुरी यांचे थेट मोठे विधान, म्हणाले, वापर…
राज्यातील महापालिकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. अनेक महापालिकांवर भाजपाची थेट सत्ता आली. मात्र, या निवडणुकीत सज्ञवात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर ती म्हणजे मनसे आहे. अनेक ठिकाणी मनसेला झिरोही फोडता आला नाही.

मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट भाजपामध्ये प्रवेश केला. संतोष धुरी यांच्या भाजपा प्रवेशनंतर मनसेला धक्का बसला. संतोष धुरी यांच्यासोबतच मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या. संतोष धुरी यांनी काही आरोप करत मनसेला सोडचिठ्ठी दिली. गेल्या 22 वर्षांपासून संतोष धुरी हे भाजपाचे काम करत. निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने त्यांनी नाराज होत भाजपाची साथ दिली. नुकताच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले. मुंबई महापालिकेच्या लढतीकडे राज्याच्या नजरा होत्या. मात्र, मुंबईची महापालिका दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही गेली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केली. पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे बघायला मिळाले.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मुंबई महापालिकेचा महापाैर आमचाच होणार आणि तोही मराठीच. मात्र, राज ठाकरे यांचा हा दावा खोटा ठरला असून भाजपाचा महापाैर मुंबई महापालिकेमध्ये बसेल, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपा सह शिवसेना शिंदे गटाचे 118 नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका जर कोणत्या पक्षाला बसला असेल तर तो म्हणजे मनसे आहे. दोन आकडी आकडा देखील मनसेला गाठण्यात यश मिळाले नाही.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांचे मनसे सैनिकांना मोठा आवाहन, थेट म्हणाले...
आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत- संजय राऊत...
Raj Thackeray On Mumbai Election Result 2026 : मनसे-उद्धव ठाकरे शिवसेना युती तुटणार का? निकालानंतर राज ठाकरेंचे पहिले संकेत काय?
BMC Election Result 2026 : मराठी माणूस तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
मनसेच्या दारूण पराभवानंतर संतोष धुरी यांनी मोठे विधान केले. संतोष धुरी यांनी म्हटले की, मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी भाजपच येणार याचे भाकीत केले होते. मनसेची चेष्टा झाली कुटुंब एकत्र आले तरी 6 जागा यापुर्वी 8 जागा मनसे जिंकले होते. जागा वाटपासाठी गोंधळ घातला वापर करून घेतला जातो आहे दुसऱ्यांला जिंकण्यासाठी मनसेचा वापर केला जातो.
युती आघाडीत मनसेची वरळीतील 1 जागा जिंकली नाही जाणीवपूर्वक शिवसेनेच्या वतीने दुसरा उमेदवार दिला. माहीम, दादर येथे काय फरकाने जागा आल्या आहेत हे पहायला हवं. सामनातील टिकेवर बोलताना संतोष धुरी यांनी म्हटले की, बाहेर पडले म्हणून तुम्ही गद्दार म्हणणार. राज ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, किती वेळा दुसऱ्यांना जिंकून आणणार म्हणजे राज ठाकरेंनी याच्या आधी ज्यांना ज्यांना मदत केली त्यांना त्यांचा फायदा झाला. परंतु मनसेला त्याचा फायदा झाला नाही..वापर झाल्याच्या नंतर गोष्टी टिकून राहतात का हे तुम्हीच ओळखावे..आता वापर करून झालेला आहे, असेही त्यांनी म्हटले.
