पूर्ण रक्कम भरलेल्या सिडको सोडत धारकांचे देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा, मनसेचं बोंबा मारो आंदोलन

| Updated on: Jun 01, 2021 | 11:18 AM

पूर्ण रक्कम भरलेल्या सिडको (CIDCO)  सोडत धारकांचे देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची तयारी केली आहे. (CIDCO MNS navi Mumbai Agitation)

पूर्ण रक्कम भरलेल्या सिडको सोडत धारकांचे देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा, मनसेचं बोंबा मारो आंदोलन
सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात
Follow us on

नवी मुंबई : पूर्ण रक्कम भरलेल्या सिडको (CIDCO)  सोडत धारकांचे देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची तयारी केली आहे. आज सिडको आणि राज्य सरकारविरोधात मनेसेने बोंबा मारो आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. हजारोंच्या संख्येने बोंबा मारल्या नंतर तरी सरकार आणि सिडकोचे डोळे उघडतील, असं मनसेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे म्हणाले. (Forgive the cost of maintenance and repair of holders leaving the full amount paid CIDCO MNS navi Mumbai Agitation)

घरांचा ताबा उशिराने

सिडकोने 2018-19 मध्ये दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जवळपास 18 हजार घरांची लॉटरी काढली होती. या लोकांना सिडकोने सांगितल्या प्रमाणे ऑक्टोंबर 2020 ला घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. परंतु जवळपास 5 हजार सिडको सोडत धारकांनी पूर्ण रक्कम भरलेली असताना देखील घरांचा ताबा अजून सिडकोने दिलेला नाही. मनसेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिडकोने 1 जूनपासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचे मंजूर केलंय. त्यामुळे या सहा हजार सोड्तधारकांना किमान 9 महिने घराचा ताबा उशिराने मिळत आहे.

सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, राष्ट्रवादी अनुभवी आणि खास व्यक्तीला संधी देणार?

अनेकांचं आर्थिक नुकसान

जवळपास सर्व सोड्तधारकांनी कर्ज काढून सिडकोला पैसे दिले आहेत. या घरांचे नियमित हप्ते या सोडत धारकांना भरावे लागत आहेत. तसेच घर नसल्यामुळे भाड्याचे पैसे ही द्यावे लागत आहेत. त्यामुळे हे सोडत धारक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ताबा उशीरा मिळत असल्याने अनेकांचं जवळपास 60 हजार ते रुपये 1 लाख आर्थिक नुकसान झालंय. अशा परिस्थितीत सिडको या सोडत धारकांना देखभाल व दुरुस्ती खर्चापोटी आकारात असलेले 58 हजार रुपये माफ करावे, अशी रास्त मागणी हे सोडत धारक करत आहेत.

मनसेचं मुख्यमंत्री, सिडकोला पत्र

मनसेने 12 मे रोजी त्या संदर्भात पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना पाठवले होते. त्यावर अजून सिडकोचे उत्तर आले नाही.

सिडको धारकांचा रोष

२6 मे रोजी #CidcoWaiveOffOtherCharges हा हॅशटॅग वापरून सिडको आणि सरकारविरुद्ध जोरदार मोहीम राबवली. जवळपास 7 हजार ट्विट करण्यात आले. यावरून सिडको सोडत धारकांचा सरकारविरुद्ध रोष दिसून येतो. या मोहिमेनंतर सुद्धा सरकारला अजून जाग येत नसल्याने आता निषेधाचे दुसरे हत्यार सिडको सोडत धारक नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसणार आहेत.

सिडकोधारकांचं बोंबा मारो आंदोलन, मनसेची साथ

हजारो सिडको सोड्तधारक उद्या सरकार आणि सिडकोला झोपेतून जागे करण्यासाठी बोंबा मारो आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सोडत धारक आपल्या परिवारासोबत घरातूनच निषेधाचे फलक दाखवतील आणि आपला निषेध व्यक्त करून बोंबा मारतील.

या आंदोलनाचे फोटो, व्हिडिओ काढून ते फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे, सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना टॅग करून प्रसारित करतील. हजारोंच्या संख्येने बोंबा मारल्या नंतर तरी सरकार आणि सिडकोचे डोळे उघडतील असा विश्वास मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केला.

(Forgive the cost of maintenance and repair of holders leaving the full amount paid CIDCO MNS navi Mumbai Agitation)

हे ही वाचा :

आजपासून नवी नियमावली, नवी मुंबईत काय सुरु काय बंद?