आजपासून नवी नियमावली, नवी मुंबईत काय सुरु काय बंद?

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग कमी होतोय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने नियमावली जारी केली आहे. (Corona Virus Lockdown Updare Navi Mumbai Lockdown Rules And regulation)

आजपासून नवी नियमावली, नवी मुंबईत काय सुरु काय बंद?
नवी मुंबईत काय सुरु, काय बंद...

नवी मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग कमी होतोय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने नियमावली जारी केली आहे. राज्यात आणखी 15 दिवस जरी टाळेबंदी वाढवलेली असली तरी राज्यांतल्या महत्त्वाच्या शहरांत की ज्या शहरांत कोरोना संसर्गाचा दर कमी आहे, तिथे सरकारने सूट दिलेली आहे. त्यानुसार नवी मुंबईमध्ये कोणत्या दुकानांना मोकळीक दिलीय, कोणती दुकानं सुरु राहू शकतात, हे आता आपण पाहूयात…! (Corona Virus Lockdown Updare Navi Mumbai Lockdown Rules And regulation)

अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरु

अत्यावश्यक सेवेतील दुकाने आता 2 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेत नसलेली एकल दुकाने ( मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता) 2 वाजेपर्यंत सुरू असतील. मात्र शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी म्हणजेच विकेंडला ही दुकाने बंद असतील.

दुपारी 2 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी संचारबंदी

अत्यावश्यक वस्तूंच्या बरोबर अन्य वस्तू देखील ई-कॉमर्स च्या माध्यमातून वितरित करता येतील. दुपारी दोन नंतर अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता इतरांना येण्या जाण्यास निर्बंध असतील.

होम डिलिव्हरीला परवानगी, शासकिय कार्यालय 25 % कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु

12 मे 2021 च्या शासन आदेशानुसार होम डिलिव्हरी परवानगी असेल. शासकीय कार्यालय 25% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. जास्तीची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून परवानगी घ्यावी.

दुकानांना नियम काय?

कृषी क्षेत्राशी संबंधित असलेली सर्व दुकानं दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुकानांना पुरवठा करणाऱ्या वस्तुंच्या वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसतील. मात्र दुकानांनी ठरवून दिलेल्या वेळेतच वस्तूंची विक्री करावी.

मुंबईत कोणती दुकाने कधी उघडणार?

मुंबईत अत्यावश्यक सेवेतली दुकाने रोज सकाळी सातपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार. इतर दुकानांसाठी बीएमसीनं वेगळे नियम जारी केलेत. त्यात कॅटरींगपासून ते इतर दुकानं, जी रोडच्या डाव्या बाजुला आहेत, ती सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ओपन राहतील तर जी रस्त्याच्या उजव्या बाजुला दुकानं आहेत, ती मंगळवार आणि गुरुवारी सुरु असतील. अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकानं शनिवार आणि रविवारी बंद असतील. ई कॉमर्सच्या सेवा मात्र चालू राहतील.

(Corona Virus Lockdown Updare Navi Mumbai Lockdown Rules And regulation)

हे ही वाचा :

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 25 हजारांनी घट, कोरोनाबळीही 2800 च्या खाली 

मुंबईत आता अत्यावश्यक सेवेतली दुकाने आठवडाभर ओपन राहणार, इतर नियम काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI