AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या माजी आमदाराची मॉब लिंचिंग, 70-80 लोकांनी घरात घुसून मारलं

former mla atar singh bhadana no more after attack in rajasthan

भाजपच्या माजी आमदाराची मॉब लिंचिंग, 70-80 लोकांनी घरात घुसून मारलं
bjp flagImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 12:00 PM
Share

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील क्रेशर प्लांटवरून रविवारी रक्तरंजित थरार झाला आहे. या वादात माजी आमदार, भाजप नेते अतर सिंह भडाना यांची मॉब लिंचिंग झाली. भडाना यांच्या घरात 70-80 लोकांनी घरात घुसून हल्ला केला आहे. या लोकांनी माजी आमदाराच्या सहकाऱ्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्या माजी आमदार भडाना यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  माजी आमदार अतर सिंह भडाना यांच्यावर भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भडाना यांनी रात्री साडेअकरा वाजता जीव सोडला. या घटनेने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. भडाना यांच्या मृत्यूनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

भडाना हे सायंकाळी साडेसहा वाजता क्रेशर प्लांट जवळ होते. मागील एक वर्षांपासून ते बंद पडलेला क्रेशर प्लांट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत होते.  या प्लांटवरूनच ग्रामीण भागात दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटात झालेली बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत पोहोचली. अनेकांनी लाठी-काठीने माजी आमदार अतर सिंह भडाना यांच्यावर हल्ला केला. या वादात अतर सिंह भडाना आणि त्यांचे सहकारी गगन शर्मा देखील गंभीर जखमी झाले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपाचारानंतर भडाना यांना जयपूरला पाठवण्यात आलं. तर गगन शर्मा यांना भरतपरला पाठवण्यात आलं.  जयपूरमध्ये एसएमएस रुग्णालयात भडाना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माजी आमदार भडाना यांची पत्नी कमलेश यांनी या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी आरोप केला की, प्लांटचं लीज कनेक्शन कापण्यात आलं. पाण्याचा पंप खराब करण्यात आला होता. प्लांटच्या येथून अनेकांना पळवण्यात येत होते. कमलेश यांच्या दाव्यानुसार, या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली जात होती. परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...