AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आरोग्य मंत्र्यांचाच मतदारसंघ आजारी”; या माजी खासदाराने पोलखोलच केली…

आमदार सरोज अहिर यांनी हिरकणी कक्षाची तक्रार केली आणि तक्रारीचे निवारणही एक दिवसात करणाऱ्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत चर्चेत आले होते. मात्र आता एका दुसऱ्याच कारणामुळेही चर्चेत आले आहेत.

आरोग्य मंत्र्यांचाच मतदारसंघ आजारी; या माजी खासदाराने पोलखोलच केली...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 01, 2023 | 1:01 AM
Share

धाराशिवः हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच महिला आमदार सरोज अहिर यांनी हिरकणी कक्षाबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर हिरकणी कक्ष सुस्थितीत करून देऊन महिला आमदारांना अश्वस्त केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत कालपासून प्रचंड चर्चेत आले. त्यांच्या कामाचा गौरव चालू असतानाच दुसरीकडे मात्र माजी खासदार संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांच्या मतदार संघाचा दौरा करून त्यांच्याच मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पंचनामा करून आरोग्य मंत्र्यांच्या मतदार संघातील आरोग्य विभागच आजारी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे या दुसऱ्या घटनेमुळेही तानाजी सावंत आता चर्चेत आले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भुम मतदार संघातील आरोग्य यंत्रणेचा थेट छत्रपती संभाजी महाराज यांनी पंचनामा केला आहे.

भूम येथील ग्रामीण रुग्णालयाला संभाजी महाराज यांनी भेट देत तेथील परिस्थितीची पोलखोल केली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स यांची कमतरता आहे. तसेच रुग्णालयातील अनेक ठिकाणी अस्वच्छता, स्वच्छतागृहात पाणी नाही, अनेक मशीन बंद असुन धुळखात पडल्या आहेत. तर डॉक्टर कर्मचारी निवासस्थान परिसरात  घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

यावेळी माजी खासदार संभाजीराजे यांच्यासमोर रुग्णालयातील अनेक रुग्णांनीही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यावेळी संभाजीराजे यांनीही त्यांच्या समस्या ऐकून घेत येथील समस्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या जातील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्य सरकारला चेतावणी दिली आहे की, काही सहन करू मात्र आरोग्य विभाग व प्राथमिक केंद्रांची दुरावस्था आम्ही सहन करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी तुम्ही काही केले नाही तर मी करून दाखवतो असं म्हणत त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

माजी खासदार संभाजीराज यांनी आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघातील आरोग्य केंद्राचाच पंचनामा केला आहे.  आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था समोर आल्याने या पंचनाम्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

आरोग्यमंत्र्याच्या मतदारसंघातच आरोग्य केंद्राची ही अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था होईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी संभाजीराजे यांनी आरोग्याचे विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा मी बघून घेईल असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.  रोग्य खात्याच्या दुरावस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून तक्रार करणार असल्याचेही छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान