सांगलीत मोठी घडामोड! जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका मताने गेम पालटला, माजी खासदाराने उधळला विजयाचा गुलाल

सांगलीत मोठी घडामोड घडली असून सांगली जिल्हा बँकेच्या निवडणकीत संजयकाका पाटील यांचा विजयाची जोरदार चर्चा होत आहे.

सांगलीत मोठी घडामोड! जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका मताने गेम पालटला, माजी खासदाराने उधळला विजयाचा गुलाल
sangli bank district election
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 10:07 AM

सांगलीत मोठी घडामोड घडली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजय झाला आहे. तर संजयकाका पाटील यांनी अवघ्या एका मताने विजयाचा गुलाल उधळला आहे. संजय पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. संजयकाका पाटील यांच्या विजयाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आमदार, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील,माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सहा जागांसाठी अत्यंत चुरशीचं मतदान झालं होतं. आज या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी झाली. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला आहे. तर पारंपारिक लढतीत संजयकाका पाटील यांनाही विजयाचा गुलाल लागला आहे. या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता बँकेतील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

Loading...

संजयकाका पाटील यांचा विजय, आमदार रोहित पाटलांना धक्का

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय झाला. या अटीतटीच्या निवडणुकीत एका मताने संजय काका पाटलांचा विजय झाला. त्यांनी शरद पवार गटाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव केला. माजी संजयकाका पाटलांना एकूण 39 मते पडली. तर माजी आमदार सुमनताई पाटील यांना 38 मते पडली. या निकालाने आमदार रोहित पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विजयामुळे अखेर संजयकाका पाटलांना विजयाचा गुलाल लागला.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय झाला. त्यांनी शरद पवार गटाचे टी व्ही पाटील यांचा पराभव केला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना 37 मते पडली. तर टीव्ही पाटील यांना 33 मते पडली. त्यांचा 4 मतांनी माजी मंत्री अजित घोरपडे यांचा विजय झाला. तर मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे विजयी झाले. त्यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांचे समर्थक भाजपाच्या अनिल शेगुनशे यांचा पराभव केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us