ग्रामसभेत तरुणाशी वाद, थेट मारहाण; गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी सरपंचाची दिलगिरी, म्हणाले…

जळगावच्या पाचोरा तालुक्यातील ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर माजी सरपंच सुनील पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

ग्रामसभेत तरुणाशी वाद, थेट मारहाण; गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी सरपंचाची दिलगिरी, म्हणाले...
former sarpanch apologizes
Image Credit source: social media
| Updated on: Oct 05, 2026 | 12:28 AM

जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावर तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून माजी सरपंचासह दोन जणांविरोधात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणात तरुणाला मारहाण करणारे माजी सरपंच सुनील पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

ग्रामसभेत संबंधित तरुणाने प्रश्न विचारल्यानंतर माजी सरपंच सुनील पाटील यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून माजी सरपंचासह दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला होता.

Loading...

माजी सरपंच म्हणाले..

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील पाटील यांनी आपण एक नागरिक म्हणून गावातील ग्रामसभेला गेलो होतो, असं सांगितलं. संबंधित व्यक्तीने त्यांच्या बखर प्लॉटमध्ये सांडपाणी सोडले होते. याबाबत लोकांनी सांगितल्यानंतर आपण ग्रामपंचायतीमध्ये 1 तारखेला तक्रार दिली होती, असं त्यांनी सांगितलं “मी त्याला या संदर्भात जाब विचारल्यानंतर तो मला अरेरावीची उत्तरे देत होता. त्या तरुणाला माझ्यासोबत विनाकारण भांडण करायचे होते. त्याने मुद्दामून अरेरावी केली व माझ्या अंगावर आला. माझा हेतू नसताना माझ्याकडून जे अनावधानाने घडले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं सुनील पाटील यांनी म्हटलं आहे.

दिलगिरीच्या व्हिडिओवरुनही नाराजी

पण झालेल्या प्रकारावरुन माजी सरपंच सुनील पाटलांवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मारहाणीचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामधील कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. अनेक युजर्सनी त्यांच्या कृत्यावरुन त्यांना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरीही त्यांच्यावरील रोष कमी होताना दिसत नाही. शेकडो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्यांच्या दिलगिरीच्या व्हिडिओवरही तशाच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. ज्यामधून त्यांच्यावरील नाराजी उघडपणे समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us