Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral

| Updated on: Nov 15, 2021 | 12:01 PM

मालेगाव हिंसाचारामागे काही धार्मिक नेत्यांची फूस आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत.

Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नाशिकः त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव पेटले. त्याचे लोण राज्यभर इतर ठिकाणी नांदेड आणि अमरावतीमध्ये पसरले. आता या प्रकरणातील एकेका सूत्रधाराला शोधून काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल केल्याने अनेक भागात वातावरण प्रक्षुब्ध झाल्याचे समोर येत असून, याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचल याला बेड्या ठोकल्या आहेत.

काय होतं त्या क्लिपमध्ये?

नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडल्याचे समजते. आझादनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या आहेत.

धार्मिक नेत्यांचीही फूस

मालेगाव हिंसाचारामागे काही धार्मिक नेत्यांची फूस आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. काही जणांना ताब्यात घेतले असून, काही जणांना ताब्यात घेण्याचा हलचाली सुरू आहेत. मात्र, पोलिस प्रत्येक पाऊल खूप खबरदारीने टाकत आहेत. अगोदरच वातावरण पेटल्याने ठोस पुरावे गोळा करणे आणि त्यानंतरच कारवाई करणे सुरू आहे.

पंचनामे पूर्ण, लाखोंचे नुकसान

मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात दगडफेकीमध्ये 11 लाख 12 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या हिंसाचाराबद्दल आतापर्यंत जवळपास 500 जणांच्या जमावावर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. तर त्यांच्यावर विविध पाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांना ताब्यात घेणे सुरू आहे.

भय संपत नाही

मालेगावमध्ये जमावाने जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर हैदोस घातला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांची वाहने फोडली. त्यात तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. ही तीव्रता पाहता अजूनही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी बाहेरून कुमक मागवली आहे. मात्र, सध्या शहरात शांतता आहे.

इतर बातम्याः

राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!

मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही काय?; शरद पवारांचं पहिल्यांदाच थेट उत्तर