AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातशे रुपयांसाठी मित्राला दगडाने ठेचले, खडवलीतील बेवारस मृतदेह प्रकरणाचे गुढ उकलले; आरोपीला मुंबईतून अटक

कल्याण जवळील खडवली नदीकाठी सापडलेल्या बेवारस मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. पोलिसांनी खडवली ते मुंबई दरम्यानचे सुमारे ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अखेर आरोपीला शोधून काढले.

सातशे रुपयांसाठी मित्राला दगडाने ठेचले, खडवलीतील बेवारस मृतदेह प्रकरणाचे गुढ उकलले; आरोपीला मुंबईतून अटक
crime scene
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 6:50 PM
Share

कल्याण जवळील खडवली नदी परिसरात तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या बेवारस मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. अवघ्या ७०० रुपयांच्या चोरीच्या संशयातून एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. टिटवाळा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करीत, पोलीस श्वान आणि सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीला मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण-टिटवाळा परिसरातील खडवली नदीकाठी तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती. मात्र, टिटवाळा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि श्वान पथकाच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी मित्राला अटक केली आहे.

७०० रुपयांवरून झाला वाद

मयत राजेश प्रभुळकर आणि आरोपी योगेश कदम हे दोघे मित्र असून एकत्र केटरर्सचे काम करायचे. घटनेच्या दिवशी दोघेही खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पार्टीही केली. यावेळी आपले ७०० रुपये राजेशने चोरले, असा संशय योगेशला आला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात योगेशने जवळच असलेला दगड राजेशच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली आणि तेथून पळ काढला.

चक्रावून टाकणारा तपास

सुरुवातीला मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, अधिकारी नितीन मुदगुन, महेश कदम आणि ठाणे एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला.श्वान पथकाची भूमिका: घटनास्थळी आणलेल्या पोलीस श्वानाने थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता दाखवला, ज्यामुळे तपासाला दिशा मिळाली.

पोलिसांनी ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले

पोलिसांनी खडवली ते मुंबई दरम्यानचे सुमारे ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात आरोपीच्या संपर्कातील एक व्यक्ती पोलिसांना सापडली, ज्याच्या माध्यमातून मृताची आणि आरोपीची ओळख पटली.

आरोपी सराईत गुन्हेगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी योगेश कदम हा सराईत गुन्हेगार आहे. राजेशच्या हत्येनंतर तो मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग परिसरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातही वाँटेड होता. विशेष म्हणजे, त्याच्यावर यापूर्वीही एका हत्येचा गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या टिटवाळा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अवघ्या काही रुपयांच्या वादातून झालेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीचा भयंकर चेहरा समोर आला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच