अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने साडेचौदा कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर केला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातल्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामं मार्गी लागणार आहेत. तर नगरपालिकेच्या ताफ्यात सुसज्ज फायर ब्रिगेड (Fire Brigade) देखील येणार आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन ते कल्याण बदलापूर राज्य महामार्ग आणि पूर्व भागातील न्यू बॉंबे हॉटेल ते राहुल नगर हनुमान मंदिर या दोन रस्त्यांची कामं गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले हे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच होते.