VIDEO: Corona Death : स्मशानभूमीत जागा अपुरी, फुटाफुटावर सरण रचलं, भंडाऱ्यात एकाचवेळी 26 जणांवर अंत्यसंस्कार

| Updated on: Apr 20, 2021 | 4:02 AM

भंडारा कोरोना स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी एकाचवेळी तब्बल 26 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले.

VIDEO: Corona Death : स्मशानभूमीत जागा अपुरी, फुटाफुटावर सरण रचलं, भंडाऱ्यात एकाचवेळी 26 जणांवर अंत्यसंस्कार
Follow us on

भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यातील परिस्थिती अतिगंभीर होताना दिसत आहे. मृतांचा आकडा दररोज वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे मृतदेह जाळण्यासाठीही मनुष्य बळ कमी पडत आहे. भंडाऱ्याच्या स्मशानभूमीत याची आज (19 एप्रिल) प्रचिती आली आहे. भंडारा कोरोना स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी एकाचवेळी तब्बल 26 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले (Funeral of 26 corona patient at a time in Bhandara).

स्मशानभूमीत जागा अपुरी, फुटाफुटावर सरण रचलं

भंडारा जिल्ह्यात एकाच वेळी 26 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या होत्या. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आलं होतं. भंडाऱ्यातील हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचं पाहायला मिळालं.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे अंत्यसंस्कार

कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलंय की राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.

कोरोनाचं भयाण वास्तव, अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये (Swami Ramanand Tirth covid center) कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.

अहमदनगरमध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार

महाराष्ट्राला सुन्न करणारी एक बातमी समोर आली. एकीकडे कोरोना संकटाला तोंड देत असताना आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक अजूनही या संकटाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पण आपण गांभीर्याने याकडे लक्ष दिलं नाही तर काय परिस्थिती उद्भवू शकते याचं चित्रण अहमदनगरमध्ये बघायला मिळालं आहे. कारण इथे एकाच वेळी 22 जणांवर अत्यंसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

उस्मानाबादमध्ये एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार

उस्मानाबादेत तर 16 एप्रिल रोजी दिवसभरात तब्बल 23 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी स्मशानभूमीत मृतक रुग्णांच्या नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. अंतिम दर्शनासाठी कुणी स्मशानभूमीच्या कम्पाउंडवर तर कुणी उंच डोंगरावर उभं राहून मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांचा हा प्रयत्न मनाला चटका लावणारा होता.

यवतमाळमध्ये एकाच वेळी 26 चिता पेटल्या

यवतमाळमध्येही एकाच वेळी 26 चिता पेटल्या होत्या. या अंत्यसंस्काराच्या वेळी आप्तेष्टांना स्पर्शही करायला मिळाला नाही.

हेही वाचा :

VIDEO: यवतमाळमध्ये एकाच वेळी 26 चिता पेटल्या, आप्तेष्ट स्पर्शही करायला तयार नसताना अंत्यसंस्कार करणाऱ्यांची बातमी

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य

व्हिडीओ पाहा :

Funeral of 26 corona patient at a time in Bhandara