AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G N Saibaba: DU प्रोफेसर जी एन साईबाबा नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात निर्दोष, कोर्टाने म्हटले…

G N Saibaba : नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणातील जी एन साईबाबाचा निकाल आला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जी एन साईबाबा आणि इतर चार आरोपींना निर्दोष सोडले आहे.

G N Saibaba:  DU प्रोफेसर जी एन साईबाबा नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात निर्दोष, कोर्टाने म्हटले...
G N Saibaba
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 05, 2024 | 11:48 AM
Share

सुनील ढगे, नागपूर | दि. 5 मार्च 2024 : नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणातील जी एन साईबाबा खटल्याचा निकाल आला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जी एन साईबाबा आणि इतर आरोपींना निर्दोष सोडले आहे. साईबाबा व अन्य साथीदारांनी दाखल केलेले अपीलवर सात सप्टेंबर 2023 रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखीव ठेवला होता. आता निकालात जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे. या प्रकरणात गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी विजय तिरकीला दहा वर्षे कारावास तर अन्य सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा झटका आहे.

एका आरोपीचा मृत्यू

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साईबाबा यांनी दाखल केलेल्या अपीलावर बहुप्रतिक्षित निर्णय आज जाहीर केला. या प्रकरणात शिक्षा झालेल्या जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे. या प्रकरणात त्यांचा अन्य एक साथीदार पांडू नरोटे याचा 25 ऑगस्ट 2022 रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला होता.

निकाल देताना काय म्हटले उच्च न्यायालयाने

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणातून पुरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी. एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकले नाही. या आधारावर जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची न्यायालयाने सुटका केली.

साईबाबा नागपूर कारागृहात

54 वर्षीय साईबाबा 99 टक्के अपंग आहेत. ते व्हीलचेअरवर आहेत. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. मार्च 2017 मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा आणि इतरांना नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याबद्दल आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यासारख्या कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल दोषी ठरवले होते. सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात साईबाबांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायमूर्ती रोहित बी देव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेही त्यावर सुनावणी केली. त्यात आरोपींना निर्दोष सोडण्यात आले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?