AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi : यंदा दहीहंडी- गणेशोत्सव कुठल्याही निर्बंधाविना, एसटीच्याही जास्त गाड्या सोडण्याचे आदेश

याबाबत एक तातडीची बैठक घेऊन परिवहन खात्याला ही या काळात एसटीच्या जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणपतीला गावी जाणारे येणाऱ्यांची ही चिंता कमी झाली आहे.

Ganesh Chaturthi : यंदा दहीहंडी- गणेशोत्सव कुठल्याही निर्बंधाविना, एसटीच्याही जास्त गाड्या सोडण्याचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
| Updated on: Jul 21, 2022 | 4:30 PM
Share

मुंबई : गेल्या दोन वर्षात कोरोनाने (Corona) अनेकांच्या आनंदावर विर्जन टाकलं होतं. कारण अनेक सण हे निर्बंधांमध्ये राहून साजरे करावे लागले होते. काही सण तर मोकळेपणाने साजरे करताच आले नव्हते, दहीहंडी (Dahi Handi) आणि गणेशोत्सव (Ganeshtosav) दणक्यात साजरे होणारे सण आहेत. तेही कोरोनामुळे गेल्या दोन अडीच वर्षात निर्बंधात साजरे करावे लागले होते. यंदा मात्र सरकारने धुमधडाक्यात हे सण साजरे करण्यास परवानगी देऊन टाकली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीला यावर्षी कोणतेही निर्बंध नसणार आहेत. तसेच याबाबत एक तातडीची बैठक घेऊन परिवहन खात्याला ही या काळात एसटीच्या जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणपतीला गावी जाणारे येणाऱ्यांची ही चिंता कमी झाली आहे.

सण मोकळेपणाने साजरे होणार

कोविडमुळे सण साजरे करता आले नाहीत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखून शांततेत सण साजरे झाले पाहिजेत याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनालाही सूचना दिल्या. गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजे यासाठी खेटे घालायला लागू नये यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

उंचीची मर्यादा हटवली

या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. खड्डे खोदण्यासाठी पैसे घेतात. मंडपाचे चार्जेस यातून सवलत दिली आहे. तसेच मंडळांकडून हमी पत्र घेत होते. ते घेण्यास मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असं सांगितलं. नियमांचं पालनं करावं लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

टोलमाफीचा मोठा निर्णय

दहीहंडीत नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडलं पाहिजे. कोविडचं संकट टळलं आहे. त्यामुळे सर्वांचा उत्साह आहे. मिरवणुका जोरात होणार. आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार. यंदा काहीच अडचण नाही. दरवर्षी मुंबई, पुणे कोल्हापूर मार्गे आणि कोकणात टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी आणि बसेस वाढवण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.