वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती.

वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू
gas cylinder (file photo)
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 4:22 PM

Jalgaon Fire Accident : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर सरार्स सुरु असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

पुणे, मुंबई, जळगावात उपचार

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील जखमी तिघांचाही उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमी 10 पैकी तिघांचा उपचार सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

या तिघांचा मृत्यू

रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहन चालक संदीप सोपान शेजवळ अशी मयत तिघांची नावे आहेत. दोघांचा मुंबईत उपचार सुरू असताना तर एकाचा जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधपणे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याची केंद्र ठिकठिकाणी सुरू असून या दुर्घटनेनंतर आता तरी पोलीस संबंधितांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

स्वस्त गॅससाठी करतात हा पर्याय

घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी आहे. त्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा वाहनांसाठी करता येत नाही. त्यानंतरही काही हॉटेल, टपरी आदी ठिकाणी हे गॅस सिलिंडर वापरले जातात. तसेच वाहनांमध्ये भरले जातात. परंतु त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही किंवा प्रशासनाकडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागत आहे.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.