गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी समोर येत आहे, उद्योगपती गौतम अदानी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत, दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा अदानी यांनी पवार यांची भेट घेतली आहे.

गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडतंय?
गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 8:09 PM

मोठी बातमी समोर येत आहे, उद्योगपती गौतम अदानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या  सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. यापूर्वी देखील अनेकदा गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर आता गौतम अदानी हे  सांत्वनपर भेटीसाठी सिल्व्हर ओकवर आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार हे आजच बारामतीवरून आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहेत, त्यानंतर आता गौतम अदानी हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज गौतम अदानी हे शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.  शरद पवार हे आज सकाळीच बारामतीमधून  सिल्व्हर ओक येथे पोहोचले. दरम्यान त्यानंतर आता गौतम अदानी हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीसाठी अदानी हे सिल्व्हर ओकवर आल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समिकरणं देखील झपाट्यानं बदलताना दिसत आहेत.  दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची देखील चर्चा सुरू झाली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर देखील या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापूर्वी शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं होतं, आपल्याला उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही कल्पना नाही, आपल्याशी यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसेच यावेळी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मोठं विधान केलं होतं. बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते, असा दावा त्यांनी केला होता.  शरद पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.