AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार,आरोपी सोडून घरच्यांना अटक, भाजप नेते पोलीस ठाण्यात, तब्बल 12 तास…

घाटकोपर येथील नित्यानंद नगरमध्ये दोन चिमुकल्यांवर अश्लील वर्तनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी 14 तासांचे आंदोलन केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच करणार असून, दोषी पोलिसांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्याची आशा आहे.

घाटकोपरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार,आरोपी सोडून घरच्यांना अटक, भाजप नेते पोलीस ठाण्यात, तब्बल 12 तास…
घाटकोप क्राईम
| Updated on: Apr 28, 2026 | 8:20 AM
Share

घाटकोपरच्या नित्यानंद नगर येथे एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींना घरात बोलावून त्यांच्याशी अश्लील वर्त करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायाक प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण शहर हादरलं. या घटनेमुळे प्रचंड संतापाचं वातावरण असून ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणात आता क्राईम ब्रांच तपास करणार आहे. पोलिसांची विशेष टीम या प्रकरणाचा संपूर्ण तपास करणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं फोनवरून जॉईंट पोलीस कमिशनर लखमी गौतम यांच्याशी बोलणं झालं आहे. घाटकोपर येथील पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी तब्बल 14 तासं आंदोलन केलं. त्यानंतर आता प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच कडून करण्यात येणार आहे, तसेच पीडित कुटुंबियांच्या घरच्यांना अटक केलेली होती, त्याचादेखील तपास होणार आहे. याच प्रकरणात जर कोणी दोषी आढळून आल्यास संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर देखील कारवाई होईल.

पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी किरीट सोमय्या आक्रमक, 14 तास आंदोलन

घाटकोपर नित्यानंद नगर येथे दोन लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी किरीट सोमय्या आक्रमक झाले. सोमय्या यांनी काल घाटकोपर चिराग नगर पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलनाची भूमिका स्वीकारली. घाटकोपर चिराग नगर पोलीस स्थानकाच्या बाहेर त्यांनी तब्बल चौदा तास आंदोलन केलं, दुपारी 2 वाजल्यापासून पहाटेच्या 4 वाजेपर्यंत हे आंदोलन चालले . पोलिसांनी ज्या प्रकारे पीडित कुटुंबीयांच्या घरातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे ती कारवाई चुकीची आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. याच आंदोलनामध्ये काल आमदार पराग शहा स्वतः किरीट सोमय्या महापौर रितू तावडे स्थानिक भाजपचे नगरसेवक उपस्थित होते तसेच हिंदू संघटना देखील उपस्थित होत्या. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यात थांबण्याची भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली होती. मध्यरात्रीमध्ये किरीट सोमय्या हे पोलिस स्थानकातचं झोपले होते.

अखेर मध्यरात्री किरीट सोमय्या यांचे पोलीस कमिशनर व जॉइंट पोलीस कमिशनर लखमी गौतम यांच्याशी बोलणं झाले. या प्रकरणाची चौकशी सहआयुक्त लखमी गौतम करणार असून यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याने किरीट सोमय्या यांनी हे आंदोलन मागे घेतले. या दरम्यान मुंबई च्या महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा आणि भाजपचे अनेक नगर सेवक आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. किरीट सोमय्या हे पोलीस ठाण्यातच जेवण करून, झोपले होते. मात्र पोलिसानी रात्री त्यांना हे आश्वासन दिल्यावर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच