उपोषणाला बसा किंवा मरा; सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही : गिरीश महाजन

| Updated on: Dec 07, 2021 | 12:08 AM

भाजप नेते गिरीश महाजन यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय. त्यांनी सरकारमधील मंत्री आंदोलक कर्मचाऱ्यांना स्वत: भेटले असते हा संप लांबलाच नसता, असं म्हटलंय.

उपोषणाला बसा किंवा मरा; सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही : गिरीश महाजन
गिरीष महाजन
Image Credit source: tv9
Follow us on

अहमदनगर : मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं अशी मुख्य मागणी संपकऱ्यांची आहे. राज्य सरकारने काढलेला तोडगा कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यामुळे हा संप अजूनही सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय. त्यांनी सरकारमधील मंत्री आंदोलक कर्मचाऱ्यांना स्वत: भेटले असते हा संप लांबलाच नसता, असं म्हटलंय.

…तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता

“आमच्या सरकारच्या काळात मोर्च्यांनी रेकॉर्ड मोडले. मात्र आम्ही प्रत्येक मोर्चाला स्वतःहून सामोरे जायचो. या सर्वाचा मी साक्षीदार आहे. मात्र या सरकारमध्ये कोणी कोणाची दखल घेत नाही. तुम्ही मोर्चा काढा उपोषणाला बसा किंवा मरा; या सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला मंत्री जाऊन भेटले असते तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता,” असे गिरीश महाजन म्हणाले. या लांबलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचेही ते म्हणाले.

अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप तरीही कारवाई नाही 

तसेच पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले. महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेलं नाही. कायदा सुव्यवस्था कुठेच राहिली नसून राज्यात काय चाललंय याची कल्पना करू शकता. हे तीन पक्षाचं सरकार आहे. मात्र कोनामध्येही एकमत नाहीये. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. तरीही कारवाई केली जात नाही. हा या सारकामध्ये निर्लज्जपणाचा कळस आहे. बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारला काम नाही,” असे गिरीश म्हणजे म्हणले.

इतर बातम्या :

OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?

‘उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचे एकही गुण नाहीत, खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, सरकार अभ्यास करेल, नवाब मलिकांची माहिती; ओबीसी नेते आक्रमक