गोकुळकडून दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ, विक्री दरही वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी याबाबतची घोषणा केली. खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमूल, मदर डेअरी या दुध विक्रेत्या कंपनींनी नुकतंच दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. …

गोकुळकडून दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ, विक्री दरही वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी याबाबतची घोषणा केली. खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमूल, मदर डेअरी या दुध विक्रेत्या कंपनींनी नुकतंच दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे.

गोकुळने संचालक मंडळाच्या बैठकीत गाय दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली. ही दरवाढ येत्या 21 मेपासून करण्यात आली. त्यामुळे तीन जूनच्या बिलात दूध उत्पादकांच्या खात्यात वाढ होणार आहे. ही दरवाढ 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफकरिता होणार आहे.

मार्च महिन्यात गोकुळने गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात केल्याने दुधाचा दर 25 रुपयांवरून 23 रुपयांवर घसरला होता. या निर्णयाव्रोधात दूध उत्पादकांमधून तीव्र पडसाद उमटले होते. दूध दर कपातीचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले. लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान झाल्यानंतर गोकुळने कच्च्या मालाच्या दरात वाढ केली. त्यामुळे पशुखाद्याच्या दरात प्रतिपोत्यामागे 100 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दूध उत्पादकांकडून गोकुळवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.

शिवसेनेनेही गोकुळवर कार्यालयावर मोर्चा काढून पशुखाद्याचे दर कमी करावे आणि गाय दूध दरात वाढ करावी, अशी मागणी केली होती. दूध उत्पादकांत निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन गोकुळने दूध दरात दोन रुपयांची वाढ केल्याची चर्चा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *