नक्षलवाद्यांना नोटबंदीच माहीत नाही? 4 लाखांच्या नोटा सापडल्या

| Updated on: Jan 25, 2021 | 8:44 AM

गोंदिया पोलिसांनी उमरपायली गावाच्या जंगलातून व्यवहारातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या तब्बल 4 लाखांच्या नोटा जप्त केल्या आहेत. (Gondia police 500 Umarpayali village)

नक्षलवाद्यांना नोटबंदीच माहीत नाही? 4 लाखांच्या नोटा सापडल्या
पोलिसांनी 500 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.
Follow us on

गोंदिया : गडिचरोली आणि गोंदियासारख्या भागात उच्छाद मांडणाऱ्या नक्षलवाद्यांच्या कित्येक अमानुष कारवाया आपण रोजच वाचतो. गळा चिरुन हत्या करणे, गावठी बॉम्बच्या मदतीने स्फोट घडवून आणने असे प्रकार नक्षलवादी सर्रासपरणे करतात. मात्र, अशा कारवाया करताना देशात काय घडते आहे?, सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत?, या साऱ्या गोष्टींबद्दल नक्षली अनतभिज्ञच असतात की काय अशी चर्चा एका प्रकारामुळे रंगली आहे. गोंदिया पोलिसांनी उमरपायली गावाच्या जंगलातून व्यवहारातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या तब्बल 4 लाखांच्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाीत या 500 रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. (Gondia police seized Rs 500 notes woth of 4 lakh from the forest of Umarpayali village)

4 लाख किमतीच्या 500 च्या नोटा

गोंदिया जिल्ह्यात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरपायली गावात  सापळा रचला होता. त्यांनी जंगलात काही स्फोटकं लपवून ठेवली होती. ही माहिती मिळताच केशोरी पोलिसांनी कारवाई करत येथील सर्व साहित्य जप्त केले. यावेळी पोलिसांना चार लाख किमतीच्या 500 रुपयांच्या नोटाही सापडल्या. 8 नोहेंबर 2016 रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटबंदीअंतर्गत 500 रुपयांच्या नोटा रद्दबातल झाल्या आहेत. मात्र, नक्षलवाद्यांकडे अजूनही या नोटा असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अजून काय काय सापडले

गोंदिया जिह्यात नक्षलवाद्यांचा वावर असतो. येथे अनेकवेळा घातपाताच्या घटना घडलेल्या आहेत. केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरपायली या गावात नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी स्फोटकं आणि पैसे लपवून ठेवले होते. ही माहिती समजताच पोलिसांनी छापा टाकत येथील सर्व स्फोटकं जप्त केले. यावेळी प्लास्टिकच्या ड्रममध्ये दीड ते दोन किलो युरिया खत, 50 ग्रॅम निरमा, कॉस्टिक सोडा, एक इलेक्ट्रिक स्विच बटन, लाल रंगाची 10 फूट इलेक्ट्रिक वायर, आणि रद्दबातल झालेल्या 500 रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या.

तसेच, या कारवाईत पोलिसांनी 10 ग्रॅम गंधक, एक कापूरवडी आणि एक जुनी बंदुकही जप्त केली आहे. नक्षली भागात स्फोटकं सापडणं यामध्ये काही विशेष बाब नसल्याचं म्हटलं जातं. मात्र, व्यवहारातून चार वर्षांपूर्वा रद्दबातल झालेल्या जुन्या 500 च्या तब्बल 4 लाख किमतीच्या नोटा सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

संबंधित बातम्या :

नक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायत निवडणूक उधळण्याचा डाव उघड, गोंदियात पुरुन ठेवलेली स्फोटकं जप्त

डोक्यावर 12 लाखांचं बक्षीस, जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला 10 वर्षांनी अटक

पोलिसांसह सी-60 कमांडोंची नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, गडचिरोलीतील कॅम्प उद्ध्वस्त

(Gondia police seized Rs 500 notes woth of 4 lakh from the forest of Umarpayali village)