
गोंदिया : गोंदियात (Gondia) जिल्ह्याच्या मोरगाव (Morgaon) तालुक्यात एका बिबट्यानं (Leopard attack) कुत्र्याची (Dog) शिकार केली आहे. या घटनेचा संपूर्ण थरारा हा सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घरात पाळलेल्या कुत्र्याची शिकार करण्यात आल्याची घटना समोर आलू असून शिकारीनंतर बिबट्यानं कुत्र्याला शेतात नेऊन ठेवलं होतं.
बिबट्यानं गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव तालुक्यातील तावशी मिल बायपास मार्गावर असलेल्या क्षीरसागगर कुटुंबीयांच्या घरात पाळलेल्या कुत्र्यावर हल्ला गेला. रात्रीच्या वेळी कुत्रा घराच्या खाली झोपला होता. कुत्र्याला बांधून ठेवण्यात आल्यानं तो स्वतःला या हल्ल्यातून वाचवू शकला नाही. बिबट्यानं या कुत्र्याचा अक्षरशः फडशा पाडलाय. ही संपूर्ण थराराक घटना क्षीरसागर यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरम्यान, या घटनेचा वनविभागानंही पंचनामा केला आहे. मनोज क्षीरसागर यांचं घर अर्जुनी-तावसी मिल बायपास रस्त्यावर आहे. घराच्या सभोवतली एक घर वगळता शेती आहे. त्यांनी घराबाहेर एका पाळलेल्या कुत्र्याला बांधलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिबट्या आला आणि त्यानं कुत्र्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याची शिकार करण्यात बिबट्याला यश आलं असून कुत्र्याची शिकार केल्यानंतर बिबट्यानं त्याला शेतात आणून सोडलं होतं.
कुत्रा ही बिबट्याची पहिली शिकार नसून याआधीही बिबट्यानं एका वासरावर हल्ला होला होता. एका वासराची या बिबट्यानं शिकार केली होती. त्यानंतर आता एका कुत्र्याचीही शिकार करण्यात आल्यानं या बिबट्याची दहशत स्थानिकांमध्ये पसरली आहे. वनविभागानंही याची गंभीर दखल घेतली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे.
unseasonal rains | अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी चिंतातूर, पिकांचे नुकसान; पंचनामे होणार काय?
तिसऱ्या लाटेचा धोका! यल्लमादेवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द, तुमच्या गावातील यात्रेचं काय?
Video: कठीण आहे काँग्रेसचं? स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला, सोनिया गांधीही बघत राहिल्या