Education News : या जिल्ह्यात शाळा सकाळच्या टप्प्यात घेण्याचा निर्णय, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आदेश

| Updated on: Mar 11, 2023 | 8:40 AM

मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारी उन्हात जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिवसभर उन्हं कडक असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा भयानक त्रास जाणवत होता.

Education News : या जिल्ह्यात शाळा सकाळच्या टप्प्यात घेण्याचा निर्णय, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आदेश
school
Image Credit source: tv9marathi
Follow us on

शाहिद पठाण, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तापमानात (Temprature) दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होत असल्याने गोंदिया जिल्हा परिषदेने सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या (morning session) टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी पत्र काढले असल्याची माहिती मिळाली आहे. मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिक वाढला आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करुन सकाळच्या टप्प्यात शाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असल्याचे बघून…

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा सकाळ टप्प्यात सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. यामुळे जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असल्याचे बघून व विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा सोमवारपासून येत्या 30 एप्रिल पर्यंत सकाळ टप्प्यात भरविल्या जाणार आहेत.

आरटीई निकषानुसार तासिका पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी

शाळा सकाळी 7 ते 11.05 वाजता या वेळेत भरविण्यात येणार असून शाळेचा पहिला सत्र सकाळी 7.05 ते 9.30 वाजेपर्यंत राहील, त्यानंतर सकाळी 9.30 ते 10 वाजता या वेळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येणार असून, शाळेचा दुसरा सत्र सकाळी 10 ते 11.05 वाजता राहील. शाळा सकाळच्या टप्प्यात भरविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच आरटीई निकषानुसार तासिका पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गजभिये यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारी उन्हात जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिवसभर उन्हं कडक असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा भयानक त्रास जाणवत होता. त्यामुळे शिक्षकांनी अधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. त्याचा विचार करुन शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.