AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 World Cup : टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये हे 2 संघ भिडणार ? सुनिल गावस्कर यांचं मोठं भाकीत; विजेताही सांगितला..

T 20 World Cup सुरू होण्यास अवघे काही तास उरले असून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत फायनलमध्ये कोणते दोन संघ एकमेकांशी भिडणार, सेमीफायनलमध्ये कोणा जाणार याबद्दल सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

T 20 World Cup : टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये हे 2 संघ भिडणार ? सुनिल गावस्कर यांचं मोठं भाकीत; विजेताही सांगितला..
सुनिल गावस्करImage Credit source: TV9
| Updated on: Feb 06, 2026 | 12:43 PM
Share

T20 World Cup 2026 Final Prediction : टी20 वर्ल्ड कप 2026 आता उद्यावर येऊन ठेपला आहे. काही तासांच या स्पर्धेतील पहिला सामना सुरू होणार असून जगभरातील क्रिकेट चाहते यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. या स्पर्धेत कोण कोण खेळणार, कोणी बहिष्कार टाकला हे तर सतत चर्चेत असतंच. मात्र या स्पर्धेला सुरूवात होणायापूर्वीच टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कोण खेळणार, कोणते 2 संघ अंतिम फेरूत धडक मारणार याबद्दल प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भाकीत केलं आहे. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीसाठी कोणते संघ दावेदार असतील हे त्यांनी उघड केलं. या स्पर्धेत अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात करावी असंही ते बोलले आहेत.

सुनील गावस्कर हे नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे हा एक मजबूत संघ असल्याचे ते म्हणाले. तसेच आयसीसी टी-20 विश्वचषकातील संघांबद्दलही दिग्गज भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांनी भाकित केलं होतं. यावेळी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील असं ते म्हणाले.

कोण पोहोचेल फायनलमध्ये ?

इतर कोणताही आशियाई संघ टी20 वर्ल्डकपच्या सेमी-फायनलमध्ये उपांत्य फेरीत पोहोचेल असं सुनील गावस्कर यांना वाटत नाही. पण टी-20 फॉरमॅट हा अत्यंत अनिश्चित असून तिथे काहीही होऊ शकतं असंही ते म्हणाले. “टी-२० क्रिकेटमध्ये एक किंवा दोन षटके संपूर्ण सामन्याचा रंग बदलू शकतात. त्यामुळे कोणत्याही संघाला पूर्णपणे वगळता येणार नाही” असं गावस्कर म्हणाले.

पण फायनल सामन्यांबद्दल त्यांचं मत अगदी ठाम आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठीचा अंतिम सामना हा इंग्लंड आणि भारतदरम्यानच होईल. खूप दबाव असूनही भारतीय संघ उत्तम कामगिरी करत या स्पर्धेचं जेतेपद पटकावेल, असा विश्वासही गावस्कर यांनी व्यक्त केला.

भारताकडे संध्या संतुलित संध आहे, त्यामध्ये अनुभवी खेळाडूंचा समावेश तर आहेत, पण युवा उर्जेचेही त्यात परिपूर्ण मिश्रण आहे. म्हणूनच भारत या स्पर्धेसाठी एक प्रबळ दावेदार दिसतोय, असं गावस्कर यांनी नमूद केलं.

रोहित-कोहलीच्या अनुपस्थितीबद्दल काय म्हणाले गावस्कर ?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या गैरहजेरीबद्दलही ते बोलले, त्यांची (दोघांची) जागा घेणं एवढं सोपं नाही, पण अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि अक्षर पटेल हे तरूण खेळाडू खूप सक्षम आहेत. त्याच्या योगदानामुळे संघाला पोकळी जाणवणार नाही असं गावस्कर म्हणाले.

अपोनिंग कोणी करावं ?

संघ निवडीबाबत गावस्कर यांनी सांगितलं की, इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी विरोधी संघासाठी मोठे आव्हान निर्माण करू शकते. डावखुरा असल्याने, जर दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळ दाखवला तर प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढेल असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...