माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर!

माथेरान, रायगड : मुंबई आणि पुण्याजवळचं प्रसिद्ध हिल स्टेशन माथेरानला नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. माथेरानला पोहोचण्याचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. माथेरानचं वैशिष्ट्य आणि जागतिक वारसा लाभलेली मिनी ट्रेनच्या शटल सेवेत आता आठ बोगी जोडण्यात आल्या आहेत. आसन क्षमता वाढल्याने पर्यटकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नेरळ ते माथेरान रोज दोन सेवा, तसेच …

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर!

माथेरान, रायगड : मुंबई आणि पुण्याजवळचं प्रसिद्ध हिल स्टेशन माथेरानला नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. माथेरानला पोहोचण्याचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. माथेरानचं वैशिष्ट्य आणि जागतिक वारसा लाभलेली मिनी ट्रेनच्या शटल सेवेत आता आठ बोगी जोडण्यात आल्या आहेत. आसन क्षमता वाढल्याने पर्यटकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

नेरळ ते माथेरान रोज दोन सेवा, तसेच शुक्रवार ते रविवार नेरळ-माथेरान तीन सेवा आणि सोमवारी माथेरान ते नेरळ तीन सेवा अशा पद्धतीने पर्यटकांच्या सोयीनुसार नेरळ ते माथेरान सेवा राबवण्यात येत आहे.

माथेरानला जाताना घाट चढून गेल्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे अमन लॉज. अमन लॉज ते माथेरान दिवसातून सात फेऱ्या तर शुक्रवार ते सोमवार 9 फेऱ्या होतात. सहा बोगीतून 114 आसन व्यवस्था असलेल्या चार बोगी आणि दोन गार्ड बोगी असा सहा बोगींचा प्रवास नियमितपणे चालू होता. आता सेकंड क्लासच्या दोन बोगी माथेरान ते अमन लॉज या शटल सेवेला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व फेऱ्यांना आसन व्यवस्था 60 ने वाढवून पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या 7-9 फेऱ्या आणि वाढीव आसन व्यवस्था वाढवून देण्यात आली आहे. पण नेरळ ते माथेरान या पूर्ण 21 किमीच्या अतंराकरिता आसन व्यवस्था वाढवून फेऱ्याही वाढविल्या तर रेल्वेचाही फायदा होईल आणि पर्यटक वाढीस चालना मिळेल, असं मत माथेरानच्या स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि वर्षाचा शेवटचा महिना सुरु होत आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये माथेरानला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यानिमित्ताने रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेत पर्यटकांना खुशखबर दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *