AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैने बोला था, एन्ट्री लेट होगी, पर ग्रेट होगी… गोपीचंद पडळकर यांनी शायरीतून कुणाला डिवचलं? चर्चांना उधाण

ईश्वरपूरमध्ये गेल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शायरीच्या माध्यमातून कोणाचेही नाव घेतला मोठा वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

मैने बोला था, एन्ट्री लेट होगी, पर ग्रेट होगी... गोपीचंद पडळकर यांनी शायरीतून कुणाला डिवचलं? चर्चांना उधाण
गोपिचंद पडळकरImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 14, 2026 | 12:02 PM
Share

आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक पार पडली. तसेच विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पडळकर हे ईश्वरपूरमध्ये आले नव्हते. आता ईश्वरपूरमध्ये गेल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शायरीच्या माध्यमातून कोणाचेही नाव घेतला मोठा वक्तव्य केले आहे.

जिंदगी जीते है हम शान से…

टिकेनंतर ईश्वरपूरमध्ये पहिल्यांदाचं आलेल्या गोपीचंद पडळकरांचे धनगर समाज बांधवांनी खांद्यावर बसवुन जोरदार स्वागत केले. यावेळी सभेतून गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता शायरीतून निशाणा साधला. मैने बोला था, एन्ट्री लेट होगी, पर ग्रेट होगी… जिंदगी जीते है हम शान से… तभी तो दुश्मन जलते है हमारे नाम से… अशा शायराना अंदाजामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना डिवचले आहे. ममता बॅनर्जीची सत्ता जाऊ शकते, तर एका साध्या आमदाराचे टेन्शन कशासाठी घेता, असा खोचक टोला देखील पडळकरांनी लगावला आहे.

धनगर आरक्षणाचा मुद्दा

तसेच सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पुन्हा मांडला आहे. धनगर आरक्षणाची लढाई आपण लढतोय, एक लाख टक्के आरक्षण मिळवण्यासाठी जी काही ताकद लावायची आहे ती आपल्याला लावावी लागेल,असं आवाहन देखील यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर

ईश्वरपूरमध्ये कुठेच अहिल्यादेवीचे स्मारक नाही. त्यामुळे ईश्वरपूरमध्ये आपल्याला लोकसहभागातून अहिल्यादेवी चे स्मारक उभा करणार असल्याचे आणि अहिल्यादेवी पुतळा देखील लोकवर्गणीतून उभा करू असे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभेत बोलताना व्यक्त केल आहे.

Follow Us
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा