
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होतायत. गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गंभीर आरोप केली. मागील दीड वर्षांपासून गोविंद याचे पूजा गायकवाड हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यादरम्यानच्या काळात गोविंदने पूजावर मोठा पैसा उडवला. फक्त पूजाच नाही तर पूजाच्या नातेवाईकांना देखील त्याने जमीन, गाड्या घेऊन दिल्या. पूजाला महागडे दागिने असो किंवा महागडे मोबाईल प्रत्येक गोष्ट गोविंद बर्गे याने पूजाला दिली. मात्र, पूजाला आता हवा होता तो म्हणजे गोविंद बर्गे याचा गेवराईतील बंगला.
गेवराईतील बंगला माझ्या नावे कर म्हणून पूजाने गोविंदवर एक दबाव टाकला. पण गोविंद बंगला तिच्या नावावर करत नसल्याने पूजाने त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. गोविंद इतका व्याकूळ झाला की, तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तिथेही काहीच होऊ शकले नसल्याने तिच्या घराबाहेर चारचाकी गाडीत बसून गोविंदने स्वत: थेट गोळी झाडली आणि स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला.
आता नुकताच गोविंद बर्गे याच्या अत्यंत जवळच्या मित्राने नर्तकी पूजा गायकवाड हिच्याबद्दल धक्कादायक माहिती सांगितली आहे. गोविंद याचा जवळचा मित्र चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले की, पूजा गायकवाड आणि तिच्या नातेवाईकांच्या सततच्या धमक्यांना गोविंद हा फार त्रस्त झाला होता आणि तो मानसिकदृष्ट्या या काळात पूर्णपणे खचला. तो मागील काही दिवसांपासून तणावात होता.
पूजाचे सासुरे गावातील घर बांधण्यासाठी गोविंदने मोठे पैसे दिले होते. फक्त हेच नाही तर पूजा गायकवाड हिला स्वत:चे कला केंद्र सुरू करायचे होते. याकरिता गोविंदने तिला थेट 8 लाख रूपये दिले होते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोविंदकडून पूजा ही पैसे काढत होती. शेवटी गोविंदने या गोष्टींना त्रस्त होऊ हे पाऊल उचलल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच गोविंद याच्या गेवराईतील बंगलयाची वास्तूशांती झाली होती.