AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण्यांचे धाबे दणाणले, आता जिल्हा बँकेच्या वसूली मोहिमेची ‘दादागिरी”

शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली होत असल्याकडे आमदारांनी आवाज उठवला होता, त्यावरून चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

राजकारण्यांचे धाबे दणाणले, आता जिल्हा बँकेच्या वसूली मोहिमेची 'दादागिरी
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 01, 2022 | 6:38 PM
Share

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेली नाशिकमधील एनडीसीसी बँक पुन्हा एकदा सक्रिय होऊ पाहत आहे. नाशिक जिल्हयातील थकबाकीदार असलेल्या 100 जणांना जिल्हा बँकेने रडारवर घेतले आहे, मागील महिन्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासनाबरोबर बैठक घेतली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना वेठीस न धरता किंवा लहान थकबाकीदारांना वेठीस धरू नका असा सज्जड दम दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला भरला होता, त्यानुसार जिल्हा बँकेच्या प्रशासनाने 100 बड्या थकबाकीदार यांच्याकडून वसूली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा धक्कादायक् प्रकार समोर आल्याने पालकमंत्री दादा भुसे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी राज्य शासन विशेष चौकशी करणार असल्याची माहिती दिली होती. याशिवाय बँकेतील गैरव्यवहारांची पाळेमुळे खोदून काढेल, असा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्याने खळबळ उडाली होती.

नाशिकच्या जिल्हा बँकेतील आर्थिक बेशिस्तीबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली होती.

शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली होत असल्याकडे आमदारांनी आवाज उठवला होता, त्यावरून चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

नाशिक जिल्ह्याची कधीकाळी अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेली एनडीसीसी बँक सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याने तिला उभारी देण्यासाठी भुसे यांनी पुढाकार घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि संचालकांना कर्ज देतांना तपासणी न करता कर्ज दिल्याची चर्चा होत असतांना संचालकांवर कारवाई न होता लहान-लहान शेतकऱ्यांना बँक प्रशासनाने वेठीस धरले होते.

जिल्हा बँकेने मागील चार महिन्यांपूर्वी ऐन शेतीचे कामे सुरू असतांना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या साधनानांवर वसूली कारवाई सुरू केली होती.

मात्र, पालकमंत्री यांनी चौकशीचा दम भरल्याने मोठ्या राजकीय थकबाकीदार यांचे धाबे चांगलेच दणाणले असून येत्या काळात काय कारवाई होते ही बघनं महत्वाचे ठरणार आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.