Gulab Cyclon : विदर्भ मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट

| Updated on: Sep 27, 2021 | 9:09 AM

गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे. विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे.

Gulab Cyclon : विदर्भ मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट
Rain Update
Follow us on

मुंबई : गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे. विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे. पुढचे 4 दिवस राज्यांतल्या विविध भागांत कमी अधिक प्रमामात पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं.

बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ काल रात्री( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकलं. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल?

27 सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वारे वाहतील. कोकणात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधागिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

हवामान विभागाकडून राज्यात 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिगोंली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

सोलापूरमधील बोरी नदीला पूर, परिसरातील गावांचा संपर्क तुटला

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता. मागच्या दोन दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, या पावसाने ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. यामुळे बळीराजाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

बीडमध्ये माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

बीडमधील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पुसरा नदीला पूर आला. यामुळे पुसरा, तिगाव, चिंचाळा गावाचा संपर्क तुटला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यालाही पावसाने झोडपले आहे.

हे ही वाचा :

Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता