AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde Case | ‘मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, गुलाबराव पाटील मैदानात

 महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ शिवसेना नेते गुलाबराव पाटील पुढे आले आहेत. (Gulabrao Patil Dhananjay Munde)

Dhananjay Munde Case | 'मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही', गुलाबराव पाटील मैदानात
| Updated on: Jan 16, 2021 | 3:35 PM
Share

जळगाव : महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या समर्थनार्थ पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पुढे आले आहेत. ‘धनंजय मुंडेंनी स्वतः जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिली आहे. मात्र, तरीही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. (Gulabrao Patil said that opposition is trying to politicize the matter of Dhananjay Munde case)

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज (16 जानेवारी) सकाळी कोरोना लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या प्रकरणाबाबत आपले मत मांडताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

“धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाबाबत स्वतः कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु विरोधकांकडून याप्रश्नी नाहक राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते,” असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच, ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील, असा विश्वासदेखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करणे चुकीचे

धनंजय मुंडे यांनी जनतेसमोर स्वतः कबुली दिली आहे. एखादा माणूस अशी कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू, असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

कुणावर अन्याय होता कामा नये : छगन भुजबळ

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. “धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत. फक्त कुणावर अन्याय होता काम नये. त्या महिलेविरुद्ध 4 ते 5 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. यावरुन जनतेने समजून घेतलं आहे,” असं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटील

हे सगळं शरद पवारांचं नाटक; ती महिला कशीही असू दे, पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: सोमय्या

रेणू शर्मांचं आणखी एक वादग्रस्त प्रकरण, ‘आधी एअरवेज अधिकाऱ्यासोबतही लगट, नंतर पोलीस तक्रार’

(Gulabrao Patil said that opposition is trying to politicize the matter of Dhananjay Munde case)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.