हे सगळं शरद पवारांचं नाटक; ती महिला कशीही असू दे, पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: सोमय्या

हे सगळं शरद पवारांचं नाटक; ती महिला कशीही असू दे, पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: सोमय्या

धनजंय मुंडे यांचे तीन-तीन बायकांबरोबर संबंध होते. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशी आहे, याचा पोलिसांनी जरुर तपास करावा. | Kirit somaiya

Rohit Dhamnaskar

|

Jan 15, 2021 | 9:59 AM

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) चांगलेच संतापले आहेत. हे सगळं शरद पवार यांचं नाटक आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत. पण त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. (BJP leader Kirit Somiaya slams NCP for not taking action on Dhananjay Munde)

गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

धनजंय मुंडे यांचे तीन-तीन बायकांबरोबर संबंध होते. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशी आहे, याचा पोलिसांनी जरुर तपास करावा. मात्र, धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत ही माहिती का लपवून ठेवली. धनंजय मुंडे यांनी काहीतरी केलंच असेल म्हणूनच संबंधित महिला त्यांना ब्लॅकमेल करत असेल. अशी व्यक्ती मंत्रिपदावर राहूच शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

‘आमच्या कार्यकर्त्याची चूक असेल तर कारवाई करु पण विनाकारण आरोप खपवून घेणार नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने चूक केली तर त्याच्यावर कारवाई नक्की केली जाईल. पण विनाकारण एखाद्यावर खोटेनाटे आरोप झाल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या आरोपांना उत्तर देण्याच्या फंदात आम्ही पडणार नाही. पोलिसांच्या चौकशीत खरं काय ते समोर येईल. त्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीवर काय कारवाई करायची हा निर्णय घेऊ, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.


संबंधित बातम्या:

…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप

शरद पवार ते अमोल कोल्हे, धनंजय मुंडे प्रकरणावर कोण काय म्हणाले?

(BJP leader Kirit Somiaya slams NCP for not taking action on Dhananjay Munde)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें