शरद पवार ते अमोल कोल्हे, धनंजय मुंडे प्रकरणावर कोण काय म्हणाले?

सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत आहेत. (Political Leaders Comment on Dhananjay Munde Rape Accusations) 

शरद पवार ते अमोल कोल्हे, धनंजय मुंडे प्रकरणावर कोण काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 4:43 PM

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. हे प्रकरण खूपच संवेदनशील असल्याने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूचे नेते अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया देत आहेत. (Political Leaders Comment on Dhananjay Munde Rape Accusations)

धनंजय मुंडे प्रकरणावर आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी वगळता शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे या दोन नेत्यांनीच या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडी धनंजय मुंडे यांच्याविषयी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार 

“माझ्या मते धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

प्यार किया तो डरना क्या? अब्दुल सत्तार 

“काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडेंवरही अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की “प्यार किया तो डरना क्या?” बाळासाहेबांचे ते शब्द मला लक्षात आहेत” असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

“अशा व्यक्तींची नावं जाहीर करणं उचित होणार नाही, मात्र भाजप नेतेच ज्यावेळी मला त्यांची नावं जाहीर करायला सांगतील, तेव्ही मी नावांची यादीच देईन. त्यांचीही अशाप्रकारची मूलबाळं आहेत. परंतु त्यांचे नेते जेव्हा नावं विचारतील, तेव्हा मी सांगेन. भाजपच्या अनेक नेत्यांनीही प्रतिज्ञापत्रात अपत्यं लपवली आहेत.” असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला. (Political Leaders Comment on Dhananjay Munde Rape Accusations)

निष्कर्ष काढण्याची घाई करु नये : जयंत पाटील

“धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जात होत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्याबाबत पोलीस जे निष्कर्ष काढतील त्यानंतर आपण अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. त्यापूर्वी आपण कोणीही निष्कर्ष काढण्याची घाई करण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

“त्यांनी यापूर्वीच एक महिला ब्लॅकमेल करण्याचे काम करते हे पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यामुळे याबाबत पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत एवढी अपेक्षा होती. पण ती उचलली नाही. शेवटी ते हायकोर्टात गेले. त्यांनी अर्ज दाखल केला आहे. याबाबतची प्राथमिक चौकशी करावी. एखादी महिला एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला बदनाम करत असेल, तर त्याचीही दखल घ्यावी. पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पोलीस पोलिसांचं काम करतील. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झाली नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.

धनंजय मुंडेंना फासावर चढवायचं का? अनिल परब 

“कोणी कोणावर आरोप केले म्हणजे कारवाई होत नसते. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची कायद्यानुसार चौकशी होईल. त्यानंतर कायदेशीर निर्णय घेतला जाईल. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत. मग काय त्यांना लगेच फासावर चढवायचं का?,” असे भाष्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले.

धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. या सर्व गोष्टींची खुलासेवार चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय तो निर्णय घेतील, असेही अनिल परब म्हणाले.

कौटुंबिक गोष्टीत राजकारण नको, राजकारण्यांनी भान ठेवावं : संजय राऊत

खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Political Leaders Comment on Dhananjay Munde Rape Accusations)

कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे एका क्षणात चिखलफेक करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आरोप सिद्ध झाले तर कारवाई होणार : अमोल कोल्हे

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यावर मुंडे यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. त्यामुळे मी यावर अजून काही बोलणे उचित ठरणार नाही. ज्यांच्यावर आरोप लागलेत ते सिद्ध झाले तर त्या लोकांवर कायदेशीर कारवाई होईलच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले.

प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली भूमिका हीच पक्षाची भूमिका: अजित पवार

धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष नवाब मलिक यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. त्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची असल्याचंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य : धनंजय मुंडे

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर नुकतंच धनंजय मुंडे यांनी जनता दरबाराला हजेरी लावली. यावेळी धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली. “मी माझी भूमिका मांडली आहे. वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे. आता पक्ष आणि पवारसाहेब यावर निर्णय घेतील.” असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. (Political Leaders Comment on Dhananjay Munde Rape Accusations)

संबंधित बातम्या : 

धनंजय मुंडे राजीनामा देणार? शरद पवारांकडे देऊ केला?

‘धनंजय मुंडेची हकालपट्टी ते आमदारकी रद्द करा’, भाजप आक्रमक

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.