धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका

गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता. | Dhananjay Munde

धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:16 AM

मुंबई: गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या (NCP) नेतृत्त्वाकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. (Big relif for Dhananjay Munde in rape accusations case)

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं.

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते.

(Big relif for Dhananjay Munde in rape accusations case)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.