ST Strike| शिष्टमंडळाला कोंडले, सदावर्तेंचा आरोप; परबांच्या राजीनाम्याची मागणी, पवार कलरफुल राजकारणात नापास झाल्याची टीका

| Updated on: Nov 25, 2021 | 1:14 PM

सदावर्ते म्हणाले की, सीताराम कुंटे यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मागे ईडी लागली. आंदोलन चिरडून काढण्यात मंत्री नापास झाले. तोंडी आदेशावर पोलिसांनी कामगारांवर लाठी चालवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

ST Strike| शिष्टमंडळाला कोंडले, सदावर्तेंचा आरोप; परबांच्या राजीनाम्याची मागणी, पवार कलरफुल राजकारणात नापास झाल्याची टीका
अनिल परब आणि गुणरत्न सदावर्ते.
Follow us on

मुंबईः नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. यावेळी कामगार शिष्टमंडळाला कोंडून ठेवले, असा आरोप गुरुवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. राज्यव्यापी एस. टी. संप विलीनीकरणासाठी सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. पवारांचे कलरफुल राजकारण आहे. त्यांनी संपकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कालच्या परीक्षेत नापास झाले आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

परबांना बडतर्फ करा

सदावर्ते म्हणाले की, नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली होती. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. काल कामगार शिष्टमंडळ गेले. त्यांना आत कोंडून ठेवले गेले. बाहेर येऊ दिले नाही. शिष्टमंडळ बाहेर येऊन सत्य सांगतील म्हणून त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढले. त्यामुळे अनिल परबांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. त्यांना तत्काळ बडतर्फ करा. अन्यथा त्यांची तक्रार राज्यपालांकडे करू, असा इशारा त्यांनी दिली.

सुप्रिया सुळेंवर टीका

सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबद्दल राज्यातील 250 डेपोतील कर्मचाऱ्यांनी दुखवटा पाळला. मात्र, याचा कळवळा खासदार सुप्रिया सुळेना आला नाही. त्यांना आर्यन खानचा कळवळा आला होता. मग आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला का गेला नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पवारांनी काल कलरफुल राजकारण केले. मात्र, ते परीक्षेत नापास झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

म्हणून कुंटेंच्या मागे ईडी

सदावर्ते म्हणाले की, सीताराम कुंटे यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मागे ईडी लागली. आंदोलन चिरडून काढण्यात मंत्री नापास झाले. तोंडी आदेशावर पोलिसांनी कामगारांवर लाठी चालवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. अनिल परब यांच्या घरी गेलेल्या कष्टकऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली. परबांच्या घरी गेलेले रझा अकादमीवाले नव्हते, असा टोला त्यांनी हाणला. या पोलिसांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्याः

संजय राऊत फक्त शिवसेनेसाठी रोखठोक, आंदोलकांची भूमिका न घेणं लज्जास्पदः अ‍ॅड गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल

संपात दुही : पडळकर-खोतांना आझाद केले, विलीनीकरणासाठी डंके की चोट पे आंदोलन, नवे नेतृत्व सदावर्तेंचा इशारा!