‘जर वैष्णवीला पाच दिवस मारहाण झाली तर मग…’, नेमकं काय म्हणाले हगवणे कुटुंबाचे वकील?

वैष्णवीला जर पाच दिवस हाणमार झाली? तर ती घरात बसेल का? या काळात तिच्या आई-वडिलांशी तिचा संपर्क झाला नाही का? ती घर सोडून का गेली नाही ? असा सवाल यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

जर वैष्णवीला पाच दिवस मारहाण झाली तर मग..., नेमकं काय म्हणाले हगवणे कुटुंबाचे वकील?
| Updated on: May 29, 2025 | 10:07 PM

पुण्यातील तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. बुधवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, यावेळी झालेल्या युक्तिवादावेळी हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेताना ती नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग करत होती असा दावा केला होता, दुशिंग यांच्या या दाव्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले हगवणेचे वकील? 

न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या आरोपींच्या जामिनासाठी प्रयत्न करणार आहोत. उशीर झाल्यामुळे जामीन अर्ज आज दाखल झालेला नाही, उद्या आम्ही जामीनासाठी अर्ज करणार आहोत. ज्या प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया येतात त्याचा मला खेद वाटतोय. लोकांच्या प्रतिक्रियांचं मला वाईट वाटत आहे. लोक ट्रोल करणार हे मला माहीत होतं. हगवणे यांची बाजू मांडून मी धोका पत्कारलेला आहे. मी माझं काम योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे, असं दुशिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वैष्णवीला जर पाच दिवस हाणमार झाली? तर ती घरात बसेल का? या काळात तिच्या आई-वडिलांशी तिचा संपर्क झाला नाही का? ती घर सोडून का गेली नाही ? चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं ही भूमिका मीडियाकडून घेण्यात येत आहे याचं मला दुःख वाटतं असंही यावेळी दुशिंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान भांडण होण्याचं मुख्य कारण मोबाईल होता, ज्यावेळी भांडण झालं, त्यावेळी आई-वडिलांना सांगण्यात आलं होतं, असा दावाही यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

दरम्यान आज वैष्णवीचा पती शशांक हगवणे, तिची सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us