AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवव्याख्याते बारुळकर महाराजांचे भीषण अपघातात निधन, पुण्यातही मृत्यूचे तांडव, महाराष्ट्र सुन्न!

ज्येष्ठ शिवव्याख्याते हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे नांदेडमध्ये अपघाती निधन झाले आहे. त्यासोबतच पुणे-नाशिक आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे.

शिवव्याख्याते बारुळकर महाराजांचे भीषण अपघातात निधन, पुण्यातही मृत्यूचे तांडव, महाराष्ट्र सुन्न!
Madhukar Maharaj
| Updated on: Apr 01, 2026 | 9:37 AM
Share

गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेल्या भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरला आहे. नांदेडमध्ये बहुजन चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि पुरोगामी विचारवंत हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला. तर पुणे जिल्ह्यातील महामार्गांवर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत जीवितहानी झाली असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नांदेड: प्रबोधनकार मधुकर महाराज बारूळकर काळाच्या पडद्याआड

नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवव्याख्याते हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे काल दुपारी दुचाकी आणि टिप्परच्या भीषण अपघातात निधन झाले. नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथे शिव कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा झाल्यानंतर महाराज आपल्या दुचाकीने स्वगावी बारूळकडे निघाले होते. यावेळी ढवळे कॉर्नर येथे आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महाराजांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सामाजिक आणि प्रबोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

कंटेनर आणि वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यालाही आज अपघातांचे ग्रहण लागले. पुणे-अहिल्यानगर आणि पुणे-नाशिक या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांवर भीषण अपघात झाले. पुणे–अहिल्यानगर मार्गावर शिक्रापूर येथे समोरून येणाऱ्या कंटेनरची आणि एका वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली.

आयशर टेम्पोचा थरारक अपघात

तसेच पुणे–नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील शिंदेवाडी चौकात एका आयशर टेम्पोचा थरारक अपघात झाला. महामार्गावरील मोठ्या स्पीड ब्रेकरवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पो थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आदळला. यामध्ये टेम्पोचा पुढचा भाग केबिन पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या घटनेत चालक दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेवाडी चौकातील वाढते अपघात पाहता स्थानिक नागरिकांकडून इथे तातडीने उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये धावती कार भस्मसात

पिंपरी-चिंचवडमधील काळभोर नगर येथे एका धावत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने, इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडी अंडरपासजवळ उभी केली. इंजिन ओव्हरहीट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दरम्यान राज्यातील या सलग अपघातांच्या घटनांमुळे रस्ते नियोजन आणि वाहन चालकांचा वेग यावर प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार