
कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सखल भागातही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे.

कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर सावित्री आणि आंबा नद्या सध्या इशारा पातळीवर आहेत. त्यामुळे सीमेलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना पावसाची रेड अलर्ट देण्यात आला आहे, कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.