AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर संकट आलंच… भर दुपारी अर्ध्या महाराष्ट्रात धो धो… टेन्शन वाढलं; या जिल्ह्यासाठी 48 तास अलर्टचे

Unseasonal Rain : आज भर दुपारी राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. असातच आता हवामान विभागाने एका जिल्ह्याला 48 तासांसाठी अलर्ट जारी केला आहे.

अखेर संकट आलंच... भर दुपारी अर्ध्या महाराष्ट्रात धो धो... टेन्शन वाढलं; या जिल्ह्यासाठी 48 तास अलर्टचे
unseasonal Rain Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 30, 2026 | 4:56 PM
Share

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आज भर दुपारी राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शहरी भागातील नागरिकांची भंबेरी उडाली. पुण्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडला. काही ठिकाणी गाराचा खच देखील पडलेला पहायला मिळाला. राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली आणि कुठे काय नुकसान झाले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यात गारांचा पाऊस

पुणे शहरासह भोरमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. भोर तालुक्यातील उत्रौली गावाच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यामुळे रस्त्यावर गारांचा सडा पडला होता. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. या पाऊसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली असली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह तालुक्यात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढग दाटून आले आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

धुळ्यातील शेतकरी चिंतेत

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुळे शहरासह धुळे तालुक्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कुसुंबा गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला, तसेच धुळे शहरात देखील पाऊस पडला.

नाशिकमध्ये पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मिरगाव, पाथरे, वावी परिसरात विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे पिके आणि फळबांगाचे नुकसान झाले आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे मिरगाव सध्या चर्चेत आहे. याच भागात आज पाऊस कोसळला.

सिन्नरमध्येही पावसाची हजेरी

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव आणि देशवंडी परिसराला आज जोरदार वारा आणि गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला आणि शेतात उभा असलेला कांदा गारांच्या माऱ्यामुळे मातीमोल झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचे पीक जमिनीला टेकले असून, गारांमुळे दाणे गळून पडले आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने अवघ्या काही मिनिटांत शेतांचे रूपांतर पांढऱ्या चादरीत केले. प्रशासनाने या भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नायगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्याला अलर्ट जारी

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून भारतीय हवामान विभाग ने पुढील 48 तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 आणि 31 मार्चदरम्यान हवामान अस्थिर राहणार असून 1 एप्रिलला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर 2 एप्रिलला परिस्थिती काहीशी सामान्य होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि वादळी वाऱ्यामुळे संभाव्य धोक्यापासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात