VIDEO | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी 41 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

| Updated on: Jul 24, 2021 | 4:18 PM

सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

VIDEO | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी  41 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग
hatnur dam1
Follow us on

नंदूरबार : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक वेगाने विसर्ग होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Heavy rains in Hatnur dam overflow 41 gates open in second day)

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहेत. सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरुच

या धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता सारंगखेडा प्रकल्पाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. यात 51 हजार 925 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 5 दरवाजे पूर्ण उघडून 75 हजार 56 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.

हतनूर क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने पाण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे दोन्ही प्रक्लपातून विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण आहे. या धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांला पाणीपुरवठा केला जातो. तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी यांसह तब्बल 130 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी पातळी 209.190 मीटर इतकी आहे.

पाहा व्हिडीओ  :

संंबंधित बातम्या : 

Video : मध्यप्रदेशसह विदर्भात पावसाची बॅटिंग, हतनूर धरणाच्या 16 दरवाज्यातून दुसऱ्या दिवशी विसर्ग सुरु

VIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले

नांदेडमध्ये ढगफुटी, कोकणतल्या नद्यांना पूर, जळगावात हतनूरमधून पाण्याचा विसर्ग, राज्यात पावसाची स्थिती कशी?