AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अमित शहांचं सुरक्षा कवच तोडणारा ‘तो’ पवार कोण?

मुंबईत अमित शहांचं सुरक्षा कवच तोडणारा हेमंत पवार(Hemant Pawar) हा मुळचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचा दावा केला.

मुंबईत अमित शहांचं सुरक्षा कवच तोडणारा 'तो' पवार कोण?
अमित शाह
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 08, 2022 | 5:53 PM
Share

मुंबई : भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Union Home Minister Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत मोठी चुक झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान एक संशयित तरुण अनेक तास त्यांच्याभोवती फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्याने पोलीसांना या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईत अमित शहांचं सुरक्षा कवच तोडणारा हा तरुण महाराष्ट्रातील धुळे(Dhule) जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

पोलिसांनी अटक केलेला तरुण धुळ्यातील

हेमंत पवार(Hemant Pawar) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. हेमंत हा मुळचा धुळे जिल्ह्यातील आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ गावचा तो रहिवासी आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचा दावा केला. या पूर्वी हेमंत  हा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही ब्लेझर घालून फिरताना दिसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 4 आणि 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्याच्या अनुषंगाने अमित शहा यांनी हा दौरा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन देखील घेतले.

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या अनुषंगाने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा आहे. असे असताना हा तरुण त्यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या वावरताना दिसून आला.

तरुणाच्या आई-वडिलांना माहितच नाही मुलगा काय काम करतो

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात संशयास्पदरित्या फिरणारा हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील आहे. त्या ठिकाणी त्याचे आई-वडील आणि भाऊ राहतात. आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचा दावा केला केलाय. मात्र, त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा नेमकं काय काम करतो? कुठे काम करतो? तो मुंबई कसा गेला? याची काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले हे देखील त्यांना माहित नाही. न्यूज चॅनेवरुन ही बातमी समजल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?