
विरार – विरारच्या (Virar) विवा लॉ कॉलेजच्या (Viva low College) मुस्लिम प्रिन्सिपल महिलेने कॉलेजच्या वातावरणाला कंठाळून राजीनामा दिला. तसेच त्यांनी राजीनामा देताना मला माझं कर्तव्य बजावत असताना त्रास होत आहे. अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने मी माझ्या पदाची राजीनामा देत आहे. मुस्लिम प्रिन्सिपल महिलेने कॉलेजमध्ये राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक हिजाब प्रकरणाची चर्चा सध्या विरारमध्ये सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच रंगली आहे. मात्र विवा कॉलेजच्या व्यवस्थापणाकडून हे सगळे आरोप खोडून काढण्यात आले आहेत. कर्नाटक हिजाब प्रकरणाचा सध्याच्या प्रकरणाशी कसल्याही प्रकरचा संबंध नसल्याचा दावा कॉलेज व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे राजीनाम्यात…
या सर्व प्रकरणात राजीनामा देणारी मुस्लिम प्रिन्सिपल महिला अद्याप समोर आलेली नाही. त्याचबरोबर आपली प्रतिक्रिया किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची प्रत्यक्ष वाच्यता कुठेचं केलेली नाही. याबाबत वसई विरार नालासोपारा परिसरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार किंवा गुन्हा नोंद केला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मॅनेजमेंटला दिलेल्या राजिन्यात मला माझं काम करताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच कॉलेजमधील वातावरण माझ्या कामासाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. अशा आशयाचा मेल त्यांनी कॉलेज मॅनेजमेंटला पाठवला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात कुठेही हिजाबचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या प्रिन्सिपल मुस्लिम महिलेने हिजाब प्रकरणातून राजीनामा दिला. किंवा कॉलेज परिसरातील अन्य काही कारण होते हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
हितेंद्र ठाकूर यांचे विरार मध्ये विवा कॉलेज
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे विरार मध्ये विवा कॉलेज आहे. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत हे विवा कॉलेज चालवले जाते. त्याचं विवा लॉ कॉलेज मध्ये 19 जुलै 2019 पासून डॉ. बटुल्ल हम्मीद नावाची महिला प्रिन्सिपल कार्यरत आहेत. 16 मार्च 2022 रोजी त्यांनी अचानक आपला मॅनेजमेंटला राजीनामा मेलद्वारे पाठवून दिला आहे. त्यानंतर हिजाब प्रकारणावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
हिजाब प्रकरणानंतर कोणता त्रास निर्माण झाला
या प्रकरणात विवा समूह कॉलेजचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र हे सर्व प्रकार चुकीचे असून, प्रिन्सिपल ने वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माझ्या संस्थेत जेवढे मुस्लिम कर्मचारी असतील. तेवढे मुस्लिम कर्मचारी दुसऱ्या कुठल्याही संस्थेत सुद्धा नसतील. 3 ते 4 वर्षे एखादी महिला आपल्या पदावर कार्यरत असताना तिला कोणताही त्रास होत नाही. पण अचानक हिजाब प्रकरणानंतर कोणता त्रास निर्माण झाला असा प्रश्नही ठाकूर यांनी विचारला आहे.