AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी शाब्दिक चकमक… नंतर फटाके फुटले… पोलिसांचा विरोध झुगारत मालेगावात जल्लोष, बॉम्बस्फोटाचा निकाल येताच हिंदुत्ववादी रस्त्यावर

मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला आणि संपूर्ण देश हादरला. आज या बॉम्बस्फोटाचा निकाल लागलाय. आरोपींच्या विरोधात पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. या निकालानंतर मालेगावत आनंद साजरा केला जात आहे.

आधी शाब्दिक चकमक... नंतर फटाके फुटले... पोलिसांचा विरोध झुगारत मालेगावात जल्लोष, बॉम्बस्फोटाचा निकाल येताच हिंदुत्ववादी रस्त्यावर
malegaon
| Updated on: Jul 31, 2025 | 1:08 PM
Share

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता बॉम्बस्फोट झाला आणि संपर्ण देश हादरला. आज या बॉम्बस्फोटाचा निकाल लागलाय. आरोपींच्या विरोधात पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. सर्वांची निर्दोष मुक्तता होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटना जल्लोष करताना दिसत आहेत. ढोलताशा आणि नाचून आपला आनंद हा हिंदुत्ववादी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.

एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करताना अनेक लोक दिसत आहेत. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढताना पोलिस दिसले. हिंदुत्ववादी संघटनांकडून मालेगावात मिरवणूक काढण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे फोटो हातात घेऊन अनेकजण या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसत आहे.

हिंदुत्वादी संघटनांना फटाके फोडण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आल्यानंतर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाली. जल्लोष करतेवेळी फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि हिंदु संघटना कार्यकर्ते यांच्या वाद झाला. पुण्यातील पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते कर्नल पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर फटाके फोडणार आहेत तसेच आनंदउत्सव साजरा करणार आहेत. हिंदुवादी संघटना जल्लोष करण्यासाठी फटाके फोडल्यावर ठाम आहे.

यासोबतच मालेगावात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या फोटोला दुग्धाअभिषेक करण्यात आला. कार्यकर्त्यांचा आनंद गगणात मावेना असे झाले आहे. पोलिसांनी मज्जाव करता देखील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. आजच्या या निकालाकडे फक्त राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. शेवटी तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला कशाप्रकारे या प्रकरणाचा त्रास झाला आणि दिला हे सांगितले आहे, यादरम्यान त्यांना रडू आले. सर्व आरोपींनी कोर्टात हात जोडून धन्यवाद मानले आहेत. आरोपींच्या विरोधात पुरावे नसल्याचे कोर्टात सांगण्यात आले. मोबाईलमध्येही काहीच सापडले नाही. फक्त संशयावर शिक्षा देता येत नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. स्फोटामध्ये वापरण्यात आलेली दुचाकी ही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरची असल्याचा पुरावा नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था