आमदार संतोष बांगर यांची अश्लील ऑडिओ क्लीप व्हायरल; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी ट्वीटवरून केली ही मागणी

यात संतोष बांगर हे एका जणांशी अश्लील शब्दात बोलत आहेत. त्यांना शिविगाळ करत आहेत. तो व्यक्तीही काही कमी नाही.

आमदार संतोष बांगर यांची अश्लील ऑडिओ क्लीप व्हायरल; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी ट्वीटवरून केली ही मागणी
| Edited By: | Updated on: Mar 19, 2023 | 4:38 PM

हिंगोली : संतोष बांगर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. बांगर आणि वाद हा विषय काही नवा नाही. मध्यंतरी एका खानावळी चालकाला संतोष बांगर यांनी शिविगाळ केली होती. तसेच त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यांचे सरकारी अधिकाऱ्यांशी वाद होत असतात. हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. आता एक नवीन ऑडिओ व्हायरल झाला. यात संतोष बांगर हे एका जणांशी अश्लील शब्दात बोलत आहेत. त्यांना शिविगाळ करत आहेत. तो व्यक्तीही काही कमी नाही. त्यानेही संतोष बांगर यांना चांगलीच शिविगाळ केली. हा व्हिडओ ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी त्यांच्या ट्वीटवरून व्हायरल केला.

मुख्यमंत्री कारवाई करणार का?

आमदार संतोष बांगर यांची शिविगाळ करणारी एक ओडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी ही ऑडिओ क्लीप व्हायरल केली. यामध्ये संतोष बांगर आणि अधिकारी एकमेकांना शिविगाळ करत असल्याचं समोर आलंय. ही ऑडिओ क्लीप ट्वीट करत मुख्यमंत्री यावर काही कारवाई करतील का, असा सवाल अयोद्ध्या पोळ यांनी उपस्थित केला.

असा आहे ऑडिओ क्लीप

या ऑडिओ क्लीपमध्ये अधिकारी म्हणतो, साहेब आम्हाला एका प्राब्लेम आहे. मी काळे बोलतो. हिंगोलीतील चिखली गावातून बोलतो. आम्हाला हे फायनन्सवाले त्रास देतात. यावर संतोष बांगर म्हणतात, संतोष बांगर मेला रे बाबा. त्याचा अॅक्सिडन्ट झाला.त्यानंतर अधिकारी शिव्या देतो. संतोष बांगरही अश्लील शब्दात शिविगाळ करतात. असा हा ऑडिओ क्लीप आहे.

मुख्यमंत्री कारवाई करणार का?

संतोष बांगर हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांचे अधिकाऱ्यांसोबत वाद होत असतात. त्याच्या ऑडिओ क्लीपही व्हायरल होत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगर यांच्यावर कारवाई करावी. पुन्हा बांगर यांना पाठीशी घालणार का, असा सवाल अयोध्या पोळ यांनी ट्वीटवरून विचारला आहे. त्यामुळे आतातरी कारवाई होते का, असा प्रश्न आहे.