AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी, जोरदार घोषणाबाजी

आज शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी, जोरदार घोषणाबाजी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2025 | 3:48 PM
Share

राज्यात हिंदींच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि पक्षांची आहे. हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता या मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी करण्यात आली. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे. सोबतच या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्वच प्रमुख नेते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान या आंदोलनापूर्वी बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या बैठकीला मराठी अभ्यास केंद्राच्या प्रमुखांसह इतर समविचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. या आंदोलनाला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं? 

दरम्यान जीआरच्या होळीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आम्ही दबाव आणू इच्छित नाही, खरतर हे आम्ही स्विकारतच नाहीत. एखादी गोष्ट ते जर लादणार असतील तर, आम्ही आमच्या वतीनं हा विषय संपवलेला आहे. आम्ही त्या जीआरची होळी केलेली आहे, त्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही. कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं आहे की आमचा हिंदीला विरोध नसला तरी तीची सक्ती आम्ही लादू देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पाच जुलै रोजी मोर्चा 

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, मराठी अस्मितेसाठी येत्या पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.  या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. या मोर्चाला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?